• Thu. Jul 9th, 2026

    Nashik Rain: नाशिकमध्ये कोसळधारेने दाणादाण! जिल्ह्यात तिघांचा मृत्यू, कळवण-सुरगाण्यासाठी आज ‘रेड अलर्ट’

    Nashik Rain: नाशिकमध्ये कोसळधारेने दाणादाण! जिल्ह्यात तिघांचा मृत्यू, कळवण-सुरगाण्यासाठी आज ‘रेड अलर्ट’

    Nashik Rain alert: प्रशासनाने पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह कळवण आणि बागलाण या सहा तालुक्यांमधील सातवीपर्यंतच्या अनिवासी शाळा आज, गुरुवारीही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    नाशिक पाऊस अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाने दाणादाण उडविली असून, त्र्यंबकेश्वर शहरात विक्रमी ३२४ मिमी, तर नशिक शहरात नऊ तासांत १४५ मिमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते, पूल पाण्याखाली गेले असून, जीवितहानीच्याही तीन घटना घडल्या आहेत. आज, गुरुवारी (दि. ९) जिल्ह्यासाठी पावसाचा ‘यलो’, तर कळवण आणि सुरगाणा तालुक्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

    हवामान विभागाचा ढगफुटीचा अंदाज मंगळवारी फोल ठरल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु, रात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. विशेषत: त्र्यंबकेश्वर तालुक्यासह नाशिक शहरात जोर अधिक राहिला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात २४ तासांत २४५ मिमी पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर गावात तब्बल ३२४ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाचा जोर राहिला. बुधवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये सरासरी ४८.२ मिमी पाऊस नोंदविला गेला.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis: मला शिव्या द्या, पण महाराष्ट्राला बदनाम करु नका! Missing linkवरुन मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
    नाशिक तालुक्यात ७३.३ मिमी, पेठमध्ये ६०.३, कळवणमध्ये ५२.७, इगतपुरीत ५२.७ आणि सुरगाण्यात ५१.४ मिमी पाऊस झाला आहे. बुधवारी दिवसभर अनेक तालुक्यांमध्ये पावसाच्या मध्यम सरी सुरूच होत्या. देवळा तालुक्यातील धबधब्याजवळ पडून मंगळवारी एका युवकाचा मृत्यू झाला होता. बुधवारी चांदवड तालुक्यात एका महिलेचा दरड कोसळून मृत्यू झाला, तर इगतपुरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यासोबत वाहून आल्याची माहिती प्रशासनाने दिली

    नाशिक शहरात १४५ मिमी पाऊस
    शहरात मंगळवारी सकाळी साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठ या कालावधीत अतिवृष्टीची नोंद झाली. २४ तासांमध्ये १२० मिमी पाऊस नोंदविला गेला. मध्यरात्री एक ते सकाळी साडेनऊ या कालावधीत शहरातील काही भागात १४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Politics : विधान भवनात मोठ्या घडामोडी, शरद पवार दाखल, आजारपणावर मात करुन एकनाथ शिंदेंही पोहोचले
    या मंडळांत अतिवृष्टी (मिमी)
    त्र्यंबकेश्वर- ३२४.२५
    वेळंज- २७५.४
    ठाणापाडा- २४४.७५
    हरसूल- २२५.७५
    दहाडेवाडी- १५८
    ओझर- १०९
    नाशिक- ९९
    पाथर्डी- ९९
    देवळाली- ९४.२५

    त्र्यंबकेश्वरमध्ये पूर, भूस्खलन
    त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरीचे पाणी तेली गल्ली, मेनरोड परिसरातील बाजारपेठेत शिरले, तर रस्त्यावरून वाहणारे पाणी थेट त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगणात शिरले. टेकड्यांवर होत असलेल्या खोदकाम व बांधकामाने पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात चिखलगाळ वाहून आला आहे. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर साचलेला गाळ हटविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
    Maharashtra TimesSatara News : अनेक कुटुंबांचे स्थलांतर, ‘मिनी काश्मीर’च्या पावसाळी पर्यटनाला अतिवृष्टीचा फटका; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच
    इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टी
    इगतपुरी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसाच्या पहिल्याच आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील प्रमुख मोठ्या धरणांच्या जलाशयात पाण्याची मोठी आवक झाल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी ११० मिमी, मंगळवारी २०० मिमी, तर बुधवारी तब्बल २०५ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात एकूण ९३४ मिमी पाऊस झाला असून, एकूण सरासरीच्या २७ टक्के पाऊस झाला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा