• Wed. Aug 26th, 2026

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांची नवी नियमावली, मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन, अन्यथा होणार कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या उत्सवात कर्णकर्कश्श आवाजाला ‘नो एंट्री’ असणार आहे. ध्वनिवर्धकात वापरल्या जाणाऱ्या प्लाझ्मा आणि प्रेशर मीडसारख्या तीव्र आवाज करणाऱ्या उपकरणांना बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडील संबंधित यंत्रणा थेट जप्त केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत सोमवारी विविध विभागांचे अधिकारी, पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Tukaram Mundhe: सचिन तेंडुलकरच्या भावापेक्षा माझा भाऊ खूपच मोठा; तुकाराम मुंढेंचे बंधूप्रेम, सभागृहात टाळ्यांचा कडकडाटमात्र, ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर पोलिस प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. उत्सव साजरा करण्यास कोणताही विरोध नसला, तरी तीव्र आवाज करणाऱ्या डीजेला परवानगी दिली जाणार नाही. डीजे, प्लाझा आणि प्रेशर मीड यांसारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांवर बंदी कायम राहणार असल्याचे अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत लागू असलेल्या नियमांचे पालन करणे मंडळांना बंधनकारक राहणार आहे. ध्वनीची निर्धारित पातळी ओलांडली जाऊ नये, यासाठी आवाजाची मर्यादा निश्चित केली जाणार आहे. तसेच डीजेमध्ये किती ‘बेस’ आणि किती ‘टॉप’ वापरता येईल, याबाबतही नियमांच्या चौकटीत आवश्यक निर्णय घेतला जाणार आहे.

नागरिकांना त्रास नको

गणेशोत्सव हा पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे उत्सवाचा आनंद घेताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता मंडळांनी घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना कर्णकर्कश्श आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी ध्वनिप्रदूषणविषयक विहित नियमांचे पालन करण्यावर भर दिला जाणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra TimesBaramati News : रोहित पवार यांच्या पीएच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर, अल्पवयीन मुलीने टोकाचा निर्णय का घेतला? पोलिसांनी सांगितलं कारणनियमभंग झाल्यास थेट कारवाई

कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. त्यामुळे यंदा उत्सवाच्या सुरुवातीपासूनच नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविल्याचे आढळल्यास संबंधित मंडळावर कारवाई करून डीजेची यंत्रणा जप्त केली जाणार आहे .‘उत्सव साजरा करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या तीव्र आवाजाला परवानगी दिली जाणार नाही. प्लाझा आणि प्रेशर हॉर्नवर पूर्णपणे बंदी राहील. ध्वनीची निर्धारित मर्यादा आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट जप्तीची कारवाई केली जाईल,’ असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्सवादरम्यान मोठ्या आवाज लाऊडस्पीकर, डीजे चालविले जातात. यावर तुमचे मत काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed