• Sat. Jun 27th, 2026

    Mumbai Crime : मुंबईत घातपात घडवण्याचा होता मोठा डाव? मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मारण्याच्या गोळ्यांचे वाटप, 14 हजार गोळ्या जप्त

    Mumbai Crime : मुंबईत घातपात घडवण्याचा होता मोठा डाव? मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मारण्याच्या गोळ्यांचे वाटप, 14 हजार गोळ्या जप्त

    महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतच मोठा घातपात घडवण्याचा डाव होता, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे. एक इसम हा मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मारण्याच्या गोळ्या पेन किलर म्हणून वाटप करत होता. पोलिसांना संशय आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

    भायखळ्यात मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मरण्याच्या गोळ्यांचे वाटप, आरोपीकडून 14 हजार गोळ्या जप्त(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईच्या भायखळा येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. इथे मोहरमदरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पेन किलरच्या गोळ्या सांगून उंदीर मारण्याच्या गोळ्या आरोपीकडून वाटण्यात येत होत्या. आतापर्यंत एकूण चार जणांना या गोळ्या वाटण्यात आल्याचं उघड झालं आहे. यापैकी एकाची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. संबंधित व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे या प्रकरणी पोलिसांनी गोळ्या वाटणाऱ्या इसमाला अटक केली आहे. त्याच्याकडून 14 हजार गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

    पोलिसांना आरोपीकडून जवळपास 50 किलो उंदीप मारण्याच्या गोळ्या मिळाल्या आहेत. आरोपीने असं का केलं? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. शेकडो लोकांचा जीव जावा यासाठी उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटप केल्या जात होत्या का? असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी पोलीस दहशतवाद या अँगलने देखील तपास करत आहेत. दहशतवादी संघटनांचा या माध्यमातून घातपात घडवण्याचा डाव होता का? या अँगलने पोलीस तपास करत आहेत.

    पोलीस काय म्हणाले?

    “काल रात्री भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहरमचा कार्यक्रम सुरु होता. या दरम्यान मुंबई पोलिसांना एक संशयित व्यक्ती तिथे मिळाला. हा व्यक्ती तिथे गोळ्यांची वाटप करत होता. पोलिसांना संशय आला. त्याची चौकशी केली तेव्हा त्याने आपण पेन किलरची कॅप्सूल वाटप करत असल्याचं सांगितलं. पण तो कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अशा प्रकारच्या गोळ्यांचं वाटप करत होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याच्याकडून गोळ्यांचा सर्व साठा जप्त केला”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    एका व्यक्तीची प्रकृती बिघडली

    “पोलिसांनी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक माहिती घेतली. पोलिसांनी त्याचा आधारकार्ड नंबर, मोबाईल नंबर, पासपोर्ट इत्यादी जप्त केले. त्यानंतर पहाटे चार वाजता पोलीस ठाण्याला माहिती मिळाली की, सलमान सय्यद नावाच्या व्यक्तीची तब्येत बिघडली होती. त्या व्यक्तीला उलटी आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याची माहिती मिळाली. या दोन्ही गोष्टींना लिंक करुन तातडीने एक पथक रवाना झाले”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

    “तांत्रिक माहितीच्या आधारावर आरोपी फैय्याज प्रेमजी याला ताब्यात घेण्यात आलं. त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. उंदीर मारणाऱ्या गोळ्यांचे वाटप करुन लोकांना हानी पोहोचवणं असा आपला उद्देश असल्याचं आरोपीने मान्य केलं”, अशी देखील माहिती पोलिसांनी माहिती दिली.

    आरोपीकडून 14900 गोळ्या जप्त

    “तपासात आतापर्यंत हे निष्पन्न झालं आहे की, आरोपी फैय्याज प्रेमजी याने 50 किलो झिंक फॉस्पाईट नावाचे विषारी पदार्थ हे ऑर्डर केले होते. त्याने 30 हजार गोळ्या ऑर्डर केल्या होत्या. पोलिसांनी काल रात्री ते आतपर्यंत केलेल्या कारवाईत 14,900 गोळ्या जप्त केल्या आहेत”, असं पोलिसांनी सांगितलं.

    आरोपी इराण आणि इराकला जावून आलाय

    “आरोपी 39 वर्षांचा आहे. तो पुण्याच्या विमाननगर परिसरातील रहिवासी आहे. त्याचे BBA पर्यंतचे शिक्षण झाले आहे. गेल्यावर्षी तो इराण आणि इराकला जावून आला आहे, अशी माहिती आतापर्यंत समोर आली आहे. दहशतवादी अँगलने तपास सुरु आहे. पण आताच त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही”, अशीदेखील प्रतिक्रिया पोलीस अधिकारी जंयत मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा