• Sun. Jun 28th, 2026

    Ketan Agarwal Death : सियाच्या आई-वडिलांकडे केतनच्या हत्येचं गूढ? साहिलनंतर त्यांचीही पोलिसांकडून कसून चौकशी

    Ketan Agarwal Death : सियाच्या आई-वडिलांकडे केतनच्या हत्येचं गूढ? साहिलनंतर त्यांचीही पोलिसांकडून कसून चौकशी

    Ketan Agarwal Death Case : केतन अगरवाल हत्येप्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. सियाचा भाऊ सोहेल याच्या चौकशीनंतर आता सियाच्या आई-वडिलांचीही चौकशी सुरु आहे. लोणावळा पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे. या चौकशीतून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : उद्योगपती केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयलच्या कुटुंबीयांभोवती आता पोलिसांनी तपासाचे जाळे अधिक घट्ट केले आहे. सियाचा भाऊ साहिल गोयल याची तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर आता लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सियाचे आई-वडील यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. या चौकशीतून प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, सिया गोयलच्या पालकांकडून केतन आणि सियाच्या नातेसंबंधांबाबत तसेच घटनेपूर्वीच्या घडामोडींविषयी सविस्तर माहिती घेतली जात आहे. तपास पथकाला या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची अपेक्षा आहे. पोलिसांच्या तपासानुसार, लोहगड किल्ल्यावरून सियाने केतन अग्रवालला सुमारे ३५० फूट खोल दरीत ढकलल्याने त्यांचा मृत्यू झाला.

    ‘सिया आणि तिच्या कुटुंबालाही शिक्षा व्हावी’

    घटनेनंतर सुरुवातीपासूनच केतनच्या कुटुंबीयांनी सिया गोयलवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत हत्या कटाचा उलगडा केला. दरम्यान, केतनची आई राखी अग्रवाल यांनी पुन्हा एकदा भावनिक प्रतिक्रिया देत सिया आणि तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, “सिया असे पाऊल उचलेल, याचा कधीच संशय आला नव्हता. आम्ही तिला घरची सून म्हणून स्वीकारले होते. माझ्या मुलाला न्याय मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे. सिया आणि तिच्या कुटुंबीयांना कठोर शिक्षा झाली तरच माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल.”

    ‘आमच्यापासून अनेक गोष्टी लपवल्या’

    राखी अग्रवाल यांनी दावा केला की, सियाच्या कुटुंबाने अनेक गोष्टी त्यांच्यापासून लपवून ठेवल्या होत्या. “सियाचे इतर ठिकाणी संबंध होते, ही माहिती आम्हाला दिली गेली नव्हती. ती आमच्या घरी होळी आणि पूजेच्या वेळी आली होती. दिवसभर आमच्यासोबत राहिली होती. तिच्या वागण्यातून कधीच संशय आला नाही,” असे त्यांनी सांगितले.

    Maharashtra TimesSiya Goyal : सियाला शिक्षा होणार की नाही? ‘ठोस पुरावाच नाही’ म्हणत वकिलाचा मोठा दावा, म्हणे ‘या’ दोन गोष्टी न्यायालयात टिकणार नाही

    याशिवाय, “माझा मुलगा मद्यपान किंवा पार्ट्यांमध्ये जात नव्हता. मात्र, सियाबाबत अनेक गोष्टी आम्हाला नंतर समजल्या. गोयल कुटुंबाने सत्य लपवून आमच्या कुटुंबाची फसवणूक केली. माझ्या मुलाला आम्ही मोठ्या प्रेमाने वाढवले. त्याला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी आहे,” असेही त्यांनी म्हटले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा