Pimpri Chinchwad Crime News : पत्नीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटे खेड परिसरात घडली.
प्रियांका यांचा गळा आवळून खून
ही घटना कुरुळी गावच्या हद्दीत बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान घडली. मृत महिलेचं नाव प्रियांका मारुती इगवे, तर पतीचं नाव महादेव मारुती इगवे असल्याची माहिती आहे. प्रियांका यांचा गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, महादेव इगवे यांना त्यांच्या पत्नीचे निलेश दिलीप कांबळे यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून पती-पत्नीमध्ये वाद होते.
Pune News : पुण्याची MH12 ओळख टिकणार? इंग्रजी अक्षरं संपत आली, प्रताप सरनाईकांनी पर्याय सांगितले, गडकरींशीही चर्चा
दरम्यान, प्रियांका यांचा खून केल्यानंतर महादेव यांनीही त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महादेव इगवे हे मूळचे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील पिसेगावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. ते कुरुळी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हत्या करण्यापूर्वी दोघांमध्ये काय घडलं?
मात्र, नेमका वाद कशावरून झाला? पत्नीच्या कथित प्रेमसंबंधाबाबत पतीला नेमकी कोणती माहिती मिळाली होती? हत्या करण्यापूर्वी दोघांमध्ये काय घडलं? आणि पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने आत्महत्येचा निर्णय का घेतला? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत. सध्या पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थिती, संबंधित व्यक्तींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
Pandharpur Urban Bank : अर्बन बँकेच्या ATMचा 3 कोटींचा सर्वात मोठा फ्रॉड, आरोपींची निर्दोष मुक्तता; पंढरपुरातील गाजलेलं प्रकरण
भडकलेल्या पतीचा थेट चाकूने हल्ला
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून; तसेच चाकूने कमरेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाकड येथे घडली. पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या मुलीवरही चाकूने वार झाल्याने ती जखमी झाली. या प्रकरणी 30 वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती (वय 35, रा. वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी पत्नीवर उपचार करण्यात येत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरातील स्वयंपाकघरात दूध गरम करत होत्या. यावेळी कंबरदुखीच्या औषधांच्या गोळ्या घेत असताना पती मागून आला. त्याने फिर्यादीला सोबत येण्यास सांगितले. मात्र, मुले जागी असून, कंबर दुखत असल्याने उद्या पाहू, असे सांगून फिर्यादीने नकार दिला. याचा राग आल्याने; तसेच आरोपीकडून तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेतला जात असल्याने त्याने ‘तुझे हे नेहमीचेच आहे, थांब आता तुला खल्लासच करतो,’ असे म्हणत दोन्ही हातांनी तिचा गळा दाबून श्वास कोंडला. त्यानंतर चाकूने तिच्या कमरेवर वार करून गंभीर जखमी केले.
