म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह नगरसेवक, अधिकाऱ्यांसाठी अपुरे पडत असल्याने नवे सभागृह उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागी चार मजली इमारत उभारली जाणार असून त्यात वरच्या मजल्यावर हे सभागृह साकारण्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.
३५० क्षमता, नगरसेवक, अधिकारी, पत्रकारांसाठी व्यवस्था, विविध सुविधांनी युक्त असे हे सभागृह असेल. ऑगस्टमध्ये कामाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे. नवे सभागृह उपलब्ध होताच, जुन्या ऐतिहासिक वास्तू असलेल्या सभागृहाचा वापर महापौरांच्या बैठकीसाठी करण्याचे नियोजनही आहे. सध्याच्या सभागृहात २२७ नगरसेवक आणि दहा स्वीकृत नगरसेवकांसाठी आसनव्यवस्था आहे. त्या व्यतिरिक्त महापालिका कर्मचारी, पत्रकार यांना उभे राहता येईल, अशी काही प्रमाणात जागा आहे. मात्र ही जागा अपुरी पडत असल्याने नवे सभागृह बांधण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली.
Versova-Bhayander Coastal Road: नव्या कोस्टल रोडसाठी झाडांची पुनर्लागवड पूर्ण झाल्याचा दावा, पण वास्तव वेगळंच; ४५ हजार खारफुटींचं काय?
मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागेत नवे सभागृह असावे, यासाठी भाजप आग्रही आहे. या जागी टाऊनहॉल, जिमखान्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. हा प्रस्ताव स्थायी समितीने नुकताच फेटाळला. त्यामुळे जिमखान्याच्या जागेवर सभागृह उभारणीचा मार्ग मोकळाही झाला. आता सुधारित आराखडा तयार करून नवीन सभागृह उभारणीचे नियोजन मुंबई महापालिकेने केले आहे. यामध्ये जिमखानाही असेल. सध्याचे सभागृह आतून साधारण ५० फूट उंच आहे. नवीन सभागृहाची आतून उंची ३० ते ४० फूट असेल. हा प्रस्ताव तयार करून त्याची लवकरच स्थायी समितीकडून मंजुरी घेतली जाणार आहे.
नवीन सभागृहात काय?
नवीन सभागृह चार मजली असेल. खाली क्रीडासंकुल, त्यावर पार्किंग व्यवस्था.
त्यानंतरच्या मजल्यावर नगरसेवक, आयुक्त, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांचे चेंबर.
सर्वांत वर सभागृह असेल. यामध्ये नगरसेवक, अधिकारी व पत्रकार बसू शकतील अशी व्यवस्था.
८० वाहनांसाठी पार्किंगची जागा असेल.
जुन्या महापालिका इमारतीतून नव्या सभागृहाच्या इमारतीत जाण्यासाठी पुलाची जोड
सत्ताधारी, विरोधकांसाठी स्वतंत्र लिफ्ट, जिने
नवीन सभागृहात महापौर, सत्ताधारी, विरोधक आणि सामान्यांसाठी चार लिफ्ट असतील. तर दोन जिने असतील. यामध्ये एक सत्ताधारी व विरोधकांसाठी असेल, अशी माहिती खणकर यांनी दिली. महापौरांना बैठकांसाठी स्वतंत्र दालन नाही. त्यामुळे त्यांच्या बैठका स्थायी समिती किंवा सुधार समितीच्या सभागृहात होत आहेत, ते म्हणाले.
Mumbai AC Local: मध्य रेल्वेवर प्रवास होणार गारेगार, CSMT ते कल्याण आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; पण सर्वसाधारण लोकल कमी करणार
“मुंबई महापालिका नवीन सभागृह उभारणार पूर्वी टाऊनहॉल उभारणीसाठी निविदा काढण्यात आली होती. त्यात सुधारणा करून याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. त्याची स्थायी समितीत मंजुरी घ्यावी लागणार आहे. नवीन सभागृहाचा आराखडाही तयार झाला असून हे सभागृह आताच्या सभागृहासारखेच वारसास्थळासारखे असेल.” – डॉ. अविनाश ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
“सध्याच्या ऐतिहासिक 66 सभागृहातील जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन सभागृह असावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नवीन सभागृहाचा नकाशा, आराखडा तयार झाला आहे. महिनाभरात यावर अंतिन निर्णय होईल आणि ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भूमिपूजन केले जाईल.” – गणेश खणकर, सभागृह नेते, मुंबई महापालिका
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा