• Sun. Jun 28th, 2026
    सियाच्या भावाची दहा तास चौकशी, चेतनसोबतच्या अफेअरबद्दल महत्त्वाचा उलगडा, आम्ही केतनशी जबरदस्ती लग्न लावलं नसतं

    Pune Ketan Agarwal Death Case : सियाने चेतनसोबतच्या प्रेमसंबंधाविषयी घरी कोणालाही सांगितले नव्हते, असा दावा साहिल गोयल याने चौकशीवेळी केल्याची माहिती आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात लोहगड किल्ल्यावरील सुरक्षारक्षक, पायऱ्यांच्या मार्गावरील विक्रेत्यांचा समावेश आहे. सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याचीही पोलिसांनी चौकशी करुन महत्त्वाची माहिती घेतली. दिवसभर चाललेल्या तब्बल दहा तासांच्या चौकशीअंती साहिल रात्री उशिरा कारने बाहेर पडला. सियाने चेतनसोबतच्या प्रेमसंबंधाविषयी घरी कोणालाही सांगितले नव्हते, असा दावा साहिलने चौकशीवेळी केल्याची माहिती आहे.

    सियाच्या फॅमिली बॅकग्राऊण्डची कसून चौकशी

    सिया गोयलच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचाही पोलिसांकडून सखोल अभ्यास केला जात आहे. शुक्रवारी दिवसभर तिच्या भावाची चौकशी करण्यात आली. सियाचा स्वभाव, केतन अग्रवाल याच्याशी होणाऱ्या विवाहाबाबत तिची भूमिका, लग्नासाठी तिच्यावर लग्नासाठी जबरदस्ती करण्यात आली का? दोघांमधील संबंधांचे स्वरूप काय होते, या मुद्द्यांवर पोलिस माहिती घेत आहेत.
    Maharashtra TimesMira Road News : पार्क गाडीतील एअरबॅग अचानक उघडली, 25 वर्षीय तरुणाच्या मानेवर आघात, गाडीतच मृत्यूने गाठलं

    साहिलची महत्त्वपूर्ण माहिती

    या चौकशीत चेतनसोबतच्या सियाच्या अफेअरबद्दल आम्हाला कल्पना नव्हती, असा दावा साहिलने केल्याची माहिती आहे. केतनशी लग्न करायचे नाही, असे सियाने मला किंवा कुटुंबाला कधीच सांगितले नाही, सियाने सांगितले असते, तर आमच्या कुटुंबाने केतनशी तिचे लग्न जबरदस्ती कधीच लावले नसते, असेही साहिल म्हणाला.

    आधी शिवीगाळ, मग पत्रकारांना धमकी; एकनाथ शिंदेंच्या सुचनेनंतर संजय दिना पाटील नरमले

    विशाल अग्रवालांकडून शंका उपस्थित

    चेतन आणि साहिल जवळचे मित्र होते, त्यामुळे साहिलला दोघांच्या प्रेमसंबंधांची १०० टक्के माहिती असणार, असे मत केतन अग्रवाल याचे पिता विशाल यांनी व्यक्त केले. कटात आणखी काही व्यक्ती सहभागी असतील, अशी शंकाही विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केली.
    Maharashtra TimesSiya Goyal Mom Dad : आम्ही म्हटलेलं सिया 19 वर्षांचीच, इतक्यात लग्न नको, पण ‘ते’ मागे लागले; बाबांचा वेगळाच दावा; तिची 10 वेळा पसंती विचारलेली!

    आठ जणांचे जबाब नोंदवले

    सुरुवातीला या घटनेकडे अपघात म्हणून पाहिले जात गेले. तपासादरम्यान संशय बळावल्याने तीन दिवसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाशी संबंधित विविध व्यक्तींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. लोहगडावरील सुरक्षारक्षक, पायरी मार्गावरील विक्रेते, अन्य संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली असून, आठ जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा