Abhimanyu Pawar on Medha Kulkarni : माझ्या बोलण्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, पण कार्यक्रम सोडून जाण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, असे अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केले.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी आमदार अभिमन्यू पवार यांनी जातीय स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप करून संताप व्यक्त केला आणि कार्यक्रमस्थळ सोडले. मात्र, पवार यांनी हा आरोप फेटाळून लावून गैरसमज झाल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली आहे.
मेधा कुलकर्णी यांचे गंभीर आरोप
‘सारथी’ संस्थेतर्फे ‘यूपीएससी’ आणि ‘एमपीएससी’ परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी पुण्यात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी पहिल्या रांगेतील रिकाम्या खुर्चीवर बसण्यासाठी जात असताना आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्याला अडवून, ‘हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही पुढे बसलात तर वाद होईल,’ असे सांगितल्याचा आरोप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला. ‘चुकीच्या बातम्या होऊ नयेत, यासाठी हा खुलासा करीत आहे. जातीचे राजकारण करू नका,’ असे आवाहनही त्यांनी केले; तसेच पवार हे माझे भाऊच आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Siya Goyal : चेतन रडायला लागला, म्हणाला तुला जमणार नाही, मीच केतनला ढकलतो, सियाचा दावा; एकमेकांवर दोषारोप सुरुच
‘परमेश्वराला स्मरुन पवारांनी सत्य सांगावे’
कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना पवारांवर गंभीर आरोप केले. हा कार्यक्रम मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि ‘सारथी’ संस्थेचा होता. मात्र, माझ्या जातीकडे चुकीच्या नजरेने पाहत कार्यक्रमाला जातीय रंग देण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पुढे बसावे, अशी माझी स्वतःचीच इच्छा होती. मात्र, अधिकारी पुढे बसण्यास सांगत असतानाही अभिमन्यू पवार यांनी ‘हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही पुढे बसू नका; वाद होईल,’ असे सांगितले. हा जागेचा नव्हे, तर जातीचा विषय आहे,’ असा दावा त्यांनी केला. परमेश्वराची शपथ घेऊन सांगते, की पवार यांनी हे शब्द उच्चारले होते. त्यांनीही परमेश्वराला स्मरून आपण असे बोललो नव्हतो, असे सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले.
Raj Thackeray News | ‘पांढरे पट्टे काय मारताय’, भडकलो तर पाहा! शिवरायांच्या जिरेटोपाचा वाद संपला
‘स्वतःला ‘सुपर सीएम’ समजतात का?’
याशिवाय, ‘मी काही मराठा समाजातील नागरिकांची कामे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. अभिमन्यू पवार अजूनही स्वतःला मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव समजतात का, स्वतःला ‘सुपर सीएम’ समजतात का,’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘त्यांच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ब्राह्मण समाजाचा मेळावा घेतला होता. प्रकृती ठीक नसतानाही मी त्या मेळाव्याला जाऊन त्यांच्या समर्थनार्थ मतदानाचे आवाहन केले होते,’ अशी आठवणही त्यांनी करून दिली.
दरम्यान, या प्रकाराची आज दिवसभर चर्चा होती. सोशल मीडियावरही याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.
Siya Goyal Mom Dad : आम्ही म्हटलेलं सिया 19 वर्षांचीच, इतक्यात लग्न नको, पण ‘ते’ मागे लागले; बाबांचा वेगळाच दावा; तिची 10 वेळा पसंती विचारलेली!
अभिमन्यू पवारांची जाहीर दिलगिरी
या वादानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी सर्व आरोप फेटाळले. ‘मेधाताईंचा गैरसमज झाला आहे. नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असल्याने त्यांनी पुढे बसावे, आपण दोघे मागे बसू, एवढेच मी सांगितले होते. त्यात जातीचा कोणताही संदर्भ नव्हता,’ असे पवार म्हणाले. ‘मेधाताई माझ्या ज्येष्ठ नेत्या आहेत. माझ्या बोलण्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रम सोडून जाण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
