Central Railway: मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढणार आहेत. लवकरच एक नवी एसी लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार असून मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि गारेगार होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, मुंबई: दोन महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या ताफ्यात उभी असलेली वातानुकूलित लोकल आता लवकरच प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान १२ फेऱ्यांद्वारे ही लोकल प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या धावत असलेल्या सर्वसाधारण लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.
एकूण एसी लोकलची संख्या १२०वर
दरवाजा बंद एसी लोकलमुळे धावत्या लोकलमधून पडण्याच्या घटनांना पूर्णपणे आळा घालणे शक्य आहे. यामुळे मुंबई उपनगरी रेल्वेच्या ताफ्यात अधिकाधिक एसी लोकल चालवण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अर्थात १ मे रोजी हार्बर मार्गावर १४ एसी फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान १२ एसी लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेतील फेऱ्यांमध्ये एसी लोकलचा समावेश करण्यात आला आहे. सध्या मुख्य मार्गावर ८० फेऱ्या असून वाढीव फेऱ्यानंतर हा आकडा ९२वर पोहोचणार आहे. मध्य रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १०८वरून १२०वर पोहोचणार आहे. याचे सविस्तर वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Train Ticket Refund Rules : ट्रेनचा प्रवास झाला तरी पैसे परत मिळतील, रेल्वेचा ‘हा’ नियम 90 टक्के प्रवाशांना माहितीच नाही सर्वसाधारण लोकलमधील प्रवाशांना एसी लोकलचे तिकीट-पास परवडत नाही. त्यातच मध्य रेल्वेवर सध्या धावत असलेल्या एसी लोकल प्रचंड विलंबाने धावत आहेत. या लोकलना विरोध नाही. मात्र, एसी लोकल सुरू करताना सध्या धावत असलेल्या सर्वसाधारण लोकल रद्द करून एसी लोकल सुरू करणे अयोग्य आहे. अतिरिक्त म्हणून नवी एसी लोकल सुरू करावी, अशी मागणी प्रवासी नरेश मानकर यांनी केली.
मध्य, हार्बरवर दुरुस्तीकामे
माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते बोरिवलीदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक असणार नाही. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे
स्थानक – माटुंगा ते मुलुंड मार्ग – अप आणि डाउन धीमा वेळ – स. ११.०५ ते दु. ३.५५ परिणाम – अप, डाउन धीम्या लोकल जलद मार्गावरून धावतील.
ट्रान्सहार्बर
स्थानक – ठाणे ते वाशी मार्ग- अप आणि डाउन वेळ – स. ११.१० ते दु. ४.१० परिणाम – ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेलकडे जाणाऱ्या अप, डाउन फेऱ्या रद्द राहतील.
Mayank Lohar: बोरिवली-पनवेल-मंगळूर… रोशनचा प्लॅन; लोकलमधील घटनेनंतर फरार; शर्टवरील एका ‘लोगो’मुळे पोलिसांच्या ताब्यात
पश्चिम रेल्वे
स्थानक – भाईंदर ते बोरिवली मार्ग – अप आणि डाउन जलद वेळ – शनि. रात्री ११.३० ते रवि. पहाटे ४.३० परिणाम-विरार-वसई रोड दरम्यान जलद फेऱ्या धीम्या मार्गावरून धावतील. दिवसा ब्लॉक नाही.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा