• Sat. Aug 15th, 2026

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2026

नाशिक, दि. १५: जिल्ह्यातील ३९ अनुकंपाधारकांना आज स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

या कार्यक्रमात अनुकंपा तत्त्वावर विविध विभागांत नियुक्ती देण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे: शितल प्रतापपुरी गोसावी, साधना रमेश बनकर, शैलेश अशोक दराडे, यश विश्वनाथ कुन्हाडे, कोमल अशोक शिंदे, हेमंत मारुती भाकरे, मयुर परशुराम सायखेडे, सिद्धेश मनेश पोतदार, नेहा योगेश गवळी, निरज पुरुषोत्तम परदेशी, मंगेश संजय पाटील, अश्विनी नरेश चौधरी, शुभम संदिप निकम, जोएल राजेश वाघमारे, रोशनी प्रकाश जाधव (विवाहनंतरचे नाव रोशनी बाबाजी शेवाळे), धीरज योगेश खैरणार, पुजा अमोल पवार (विवाहपुर्वीचे नाव पुजा जयवंत गवळी), सनी ज्ञानेश्वर तांदळे, चेतना अजय तायडे, जुनेरा साजीद मनियार, रोहित गोरक्ष जाधव, प्रणव संजय अहिरराव, वैशाली केशव चौधरी, प्रतिक मोहन ओहोळ, युवराज अभिजीत कपाटे, कृष्णा राजेंद्र कदम, अभिजित शरद राऊत, मनोहर शिवाजी गांगुर्डे, योगेश बाळु मुंजे, राहुल राजेश संघानशिव, अजय सदाशिव दोंदे, रामदास दशरथ तिखांडके, ज्योती उत्तम चेबाळे, टिनुराज प्रदिप व्यवहारे, मानसी समाधान आहेर, अजरउद्दीन सलीम शेख, राहुल मधुकर ठाकरे, तेजस्वी निळकंठ यादव, वर्षा सागर पाटील यांना जिल्ह्यातील विविध कार्यालयात नियुक्ती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सध्या नाशिक जिल्ह्यात अनुकंपाचे एकही प्रकरण प्रलंबित नसल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. याप्रसंगी अनुकंपाधारकांचे कुटुंबीय,  नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed