• Sat. Aug 15th, 2026

शिक्षणमहर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतनच्या सुसज्ज ग्रंथालय इमारतीचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2026

धुळे, दि. १५: शिक्षणमहर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नवीन सुसज्ज ग्रंथालय इमारतीचे लोकार्पण राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज करण्यात आले. विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या ग्रंथालयात डिजिटल व ई-लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्सना पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद भदाणे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील, प्राचार्य श्री.कचवे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, धुळे जिल्ह्याच्या विकासात शिक्षण क्षेत्राला विशेष महत्त्व असून, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे आधुनिकीकरण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. तंत्रनिकेतनच्या विस्तीर्ण परिसरात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कालखंडात तंत्रज्ञान शिक्षणाला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आज ग्रंथालय, डिजिटल लायब्ररी व ई-लायब्ररीचे लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास, संशोधन आणि नवोपक्रमासाठी या सुविधांचा मोठा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.

तंत्रनिकेतनच्या 52 एकर परिसरासाठी कंपाउंडचे काम तसेच ड्रोन तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी आतापर्यंत सुमारे 11 कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नवीन ग्रंथालयाची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती घेतली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed