• Sun. Jun 28th, 2026
    प्राजक्ता हार्ट अटॅकने गेली, बदलापुरात नवऱ्याचा बनाव, गर्लफ्रेण्डचं गुपित फुटलं अन् अडीच महिन्याने धक्कादायक उलगडा

    Prajakta Meher Death Case : योगेशचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते आणि तो प्राजक्तावर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता, मात्र तिने नकार दिल्याने त्याने टोकाचा मार्ग निवडला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बदलापूर : बदलापूर येथील विवाहितेची हत्या केल्याप्रकरणी तिचा ४० वर्षीय पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे. नाक तोंड दाबून पत्नीचा खून केल्यानंतर तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न मायलेकाने केला होता. प्राजक्ता मेहेर असे मयत महिलेचे नाव होते.

    फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक उलगडा

    मंगळवारी बदलापूर पोलिसांना प्राप्त झालेल्या फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालांमधून हा हत्येचा प्रकार उघडकीस आला. या अहवालांनुसार प्राजक्ता मेहेर यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे आणि गळा आवळल्यामुळे झाला होता. हा निष्कर्ष कुटुंबाने केलेल्या ‘नैसर्गिक मृत्यू’च्या दाव्याच्या अगदी उलट होता. या निष्कर्षाच्या आधारे, पोलिसांनी प्राजक्ता यांचा पती योगेश आणि सासू अरुणा यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.

    घटस्फोटासाठी दबाव

    प्राजक्ता आणि योगेश यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता. त्यांना १५ आणि ११ वर्ष वयाची दोन मुले आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या आरोपानुसार, योगेशचे त्याच्याच गावातील एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते आणि तो प्राजक्तावर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता, मात्र तिने त्यास नकार दिला होता.
    Maharashtra TimesSiya Goyal : चेतन रडायला लागला, म्हणाला तुला जमणार नाही, मीच केतनला ढकलतो, सियाचा दावा; एकमेकांवर दोषारोप सुरुच
    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोट मिळवण्यासाठी योगेशने आपल्या सासरच्या मंडळींना पैसेही देऊ केले होते, परंतु त्यांनी ती रक्कम नाकारली. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.

    आधी शिवीगाळ, मग पत्रकारांना धमकी; एकनाथ शिंदेंच्या सुचनेनंतर संजय दिना पाटील नरमले

    व्हिसेरा अहवालात उलगडा

    ९ एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ता यांच्या कुटुंबीयांना कळवले की, तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. सुरुवातीला उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आणि बॉडी शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवली. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी सांगितले की, पुढील तपासणीसाठी प्राजक्ताचे ‘व्हिसेरा’ नमुने जतन करून ठेवण्यात आले होते. याचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले.
    Maharashtra TimesPune Crime : केतनला टक्कल, विग घालत असल्याने लग्नाची इच्छा उडाली, सियाचा नवीन दावा; लोहगड प्लॅन फेल झाल्यास पुढचा कटही शिजलेला
    प्राजक्ता यांच्या पालकांनी योगेशचे ज्या महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत, तिला तसेच या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या इतर कुटुंबीयांनाही अटक करण्याची मागणी केली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा