म. टा. प्रतिनिधी, पुणे: नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी पारंपरिक पद्धतीऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘व्हर्च्युअल पंचनामा’ करण्याचा अभिनव पर्याय अवलंबला. आरोपीच्या कबुलीजबाबाच्या आधारे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून राम मंदिर परिसरातून गुन्ह्याशी संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे, अशा प्रकारे व्हर्च्युअल तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीच्या निवेदनावर आधारित पंचनामा न्यायालयात कायदेशीररीत्या सिद्ध झाल्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याची माहिती विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी दिली.
आरोपी भीमराव कांबळे याने चिमुकल्या मुलीला गाठीशेव देऊन गायीचे वासरू दाखवतो असे सांगून गोठ्यात नेले होते. घटनास्थळावरून पोलिसांनी गाठीशेव जप्त केली होती; तसेच आरोपीच्या अंगझडतीतही गाठीशेव सापडली होती. ‘व्हर्च्युअल पंचनाम्या’त मंदिरातून आरोपीचे साहित्य मिळाले. त्यातही गाठीशेव होती. ती गाठीशेव कोठून घेतली याचा तपास एका स्वीटहोममध्ये केला. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीने घटनेच्या दिवशी सकाळीच गाठीशेव खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे साहित्य, त्याची अंगझडती आणि घटनास्थळावरून सापडलेली गाठीशेव एकच असल्याचे सिद्ध करून पोलिसांनी एक भक्कम पुरावा सादर केला.
या प्रकरणात सुरुवातीच्या टप्प्यात घटनास्थळाची पुनर्रचना (सीन रीक्रिएशन) करण्यासाठी आरोपीला तेथे नेणे आवश्यक होते. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला मध्यरात्री नसरापूरला नेले होते. मात्र, नसरापूर परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि आरोपीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली.
त्यानंतर तपासादरम्यान आरोपीला पुन्हा नसरापूरला नेण्याची गरज निर्माण झाली. अटक केल्यानंतर वडगाव पोलिस ठाण्यात असताना आरोपीने गुन्ह्याशी संबंधित काही वस्तू नसरापूर येथील राम मंदिरात लपवून ठेवल्याची स्वेच्छेने माहिती दिली. मात्र, त्या वेळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि आरोपीच्या जीवाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याला प्रत्यक्ष घटनास्थळी नेणे धोकादायक ठरू शकत होते. या पार्श्वभूमीवर, तपास पथकाने वेगळी रणनीती आखली. दोन पंचांना राम मंदिर परिसरात पाठवण्यात आले आणि आरोपीला व्हिडिओ कॉलद्वारे त्या ठिकाणाशी जोडण्यात आले. व्हिडिओ कॉलवरून आरोपीने वस्तू लपवलेली जागा दाखवून दिल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत त्या ठिकाणाहून संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या आणि त्याचा पंचनामा करण्यात आला.
या संपूर्ण प्रक्रियेची न्यायालयात कायदेशीर मांडणी विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी केली. आरोपीच्या निवेदनावर आधारित व्हर्च्युअल माध्यमातून करण्यात आलेली जप्ती आणि त्या संदर्भातील पंचनामा न्यायालयाने ग्राह्य धरल्याचे त्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा