Nagpur News: पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तरुणाचा मोबाईल फोन फोडण्यात आला. तसेच, पोलिसांकडे तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकीही आरोपींनी दिली.
‘गे’ डेटिंग ॲपवरून मैत्री, भेटायला बोलावलं अन् नंतर तरुणासोबत भयंकर प्रकार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : ‘गे’ डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून मारहाण, धमकावून लूटमार करणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आणखी अशाच प्रकारच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलिस परिमंडळ-२च्या उपायुक्त अर्चना सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक डिलिव्हरी बॉय आपले काम आटोपून ॲक्टिव्हावरून घरी परतत होता. मानकापूर चौक परिसरात त्याला एका तरुणाने मदतीची विनंती केली. मानवतेच्या भावनेतून पीडिताने त्या तरुणाला आपल्या दुचाकीवर बसवून पुढे नेण्यास होकार दिला. मात्र काही अंतर गेल्यानंतर संबंधित तरुणाने आपल्या इतर साथीदारांना बोलावले आणि सर्वांनी मिळून पीडित तरुणाला जबरदस्तीने ताब्यात घेतले.
आरोपींनी पीडित तरुणाची दुचाकीची चावी, मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड हिसकावून घेतले. त्यानंतर जवळपास तीन तास त्याला नागपूर शहरातील विविध भागांत फिरवत धमकावण्यात आले. एवढेच नव्हे तर, त्याच्या परिचितांना फोन करून खोटे कारण सांगत पैसे पाठवण्यास भाग पाडले. पीडित तरुणाच्या मित्रांनी तीन वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे त्याच्या खात्यात एकूण १० हजार रुपये जमा केले. आरोपींनी एटीएम कार्डचा वापर करून संपूर्ण रक्कम काढून घेतली.
तपासादरम्यान पोलिसांसमोर धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींपैकी एकाने “पोलो” या ‘गे’ डेटिंग ॲपवरून तरुणाशी संपर्क साधला होता. काही दिवस दोघांमध्ये चॅटिंग आणि संवाद सुरू होता. त्यानंतर मानकापूर चौकात भेटण्याचे आमिष दाखवत तरुणाला बोलावण्यात आले. तेथे आधीपासूनच दबा धरून बसलेल्या टोळीने त्याला जाळ्यात ओढून ही लूटमार केली.
या गंभीर घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, सीसीटीव्ही फुटेजमधूनही त्यांचा सहभाग स्पष्ट झाला. त्यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली. सध्या पोलिस या टोळीने यापूर्वीही अशाच पद्धतीने इतर तरुणांना लक्ष्य केले आहे का, याचा तपास करत आहेत. तसेच या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचाही शोध सुरू असून तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा