Pune Crime: केतन अग्रवालच्या वडिलांनी सिया गोयलच्या कुटुंबियांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. विशेषत: सियाच्या आत्येवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली आहे. लोहगडाच्या कड्यावरुन पडून केतनचा मृत्यू झाला. केतनला कड्यावरुन खाली ढकलल्याचा आरोप सिया आणि चेतनवर आहे. या प्रकरणी दोघांची पोलीस चौकशी सुरू आहे. केतनच्या वडिलांनी कायदा आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. गुन्हेगारांना शिक्षा होईल याबद्दल त्यांनी खात्री व्यक्त केली आहे.
‘न्याय व्यवस्थेवर मला विश्वास आहे. सिया गोयल, चेतन चौधरी आणि या प्रकरणात अन्य दोषींना शिक्षा होईल आणि माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल,’ असं केतनचे वडील विशाल अग्रवाल म्हणाले. ‘केतन लोहगडाच्या कड्यावरुन पाय घसरुन पडला, असं सियानं सगळ्यांना सांगितलं. त्या ठिकाणी तेव्हा ते दोघेचे तिथे होते. त्यामुळे आम्ही तिच्यावर विश्वास ठेवला. पण पोलीस तपासातून सत्य समोर आलं. पोलिसांच्या हाती पुरावे लागले आहेत,’ असं विशाल अग्रवाल यांनी माध्यमांना सांगितलं. Pune Crime: सिया-चेतनचा पाय खोलात; ‘थर्ड वेव्ह’मधलं फुटेज पोलिसांच्या हाती; ‘त्या’ 55 मिनिटांत काय घडलं? सियाच्या बाबतील गोयल कुटुंबानं आम्हाला अंधारात ठेवल्याचा आरोप विशाल अग्रवाल यांनी केला. ‘सियाबद्दलच्या अनेक गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवण्यात आल्या. तिचं शिक्षण, जीवनशैली आणि मद्यपानाच्या सवयीबद्दल अनेक गोष्टी लपवल्या गेल्या. तिचा मद्यपान करतानाचा व्हिडीओ आज मी टीव्हीवर पाहिला. आम्हाला त्याची कल्पनाच देण्यात आली नव्हती. सिया अतिशय चांगली मुलगी असून मी तिची खात्री देते, असं तिच्या आत्येनं म्हटलं होतं. सियाचे अन्य तरुणाशी प्रेमसंबंध होते. याबद्दल तिनं आधीच सांगितलं असतं, तर आज हा दिवस उजाडला नसता,’ असं अग्रवाल म्हणाले.
दुसरीकडे चेतन चौधरीचे नातेवाईक उदाराम चौधरी यांनी तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. ‘चेतन निष्पाप आहे. त्याचा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही. आम्हाला सियाबद्दल कोणतीही माहिती नाही, आम्हाला तिचं नाव माध्यमांमधून समजलं,’ असं चौधरी म्हणाले. Ketan Agarwal: केतनला संपवून सेफ राहण्याचा चेतनचा प्लान; हुशारीनं 5 युक्त्या केल्या, सगळ्या अंगाशी आल्या केतन आणि सिया यांचा साखरपुडा फेब्रुवारीत झाला. नोव्हेंबरमध्ये ते दोघे विवाह बंधनात अडकणार होते. सियाला केतनसोबत लग्न करायचं नव्हतं. तिचे चेतन चौधरीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिनं चेतनच्या मदतीनं केतनला संपवण्याचा कट आखला. १८ जूनला केतन आणि सिया लोहगडावर फिरायला गेले होते. त्यावेळी चेतनही दोघांच्या मागे होता. एका निर्जन कड्यावर केतन आणि सिया पोहोचताच चेतन तिथे आला. यानंतर त्यानं सियाच्या मदतीनं केतनला खाली ढकलून दिलं. यानंतर सियानं केतन सेल्फी काढताना पाय घसरुन पडल्याचा कांगावा केला.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा