• Sat. Aug 15th, 2026

Ratnagiri Teacher Rahul Sapre Passes Away : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, गावातील ग्रामस्थ, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उप सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.

देवरुख हायस्कूल राहूल सप्रे सर निधन(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरूख हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून खास ओळख असलेले, सगळ्यांचे लाडके राहूल रमेश सप्रे (वय 47) यांचं काल गुरुवारी पहाटे दुःखद निधन झालं. गेले काही दिवस ते अल्पशा आजारातून बरेही झाले होते. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आजारावर मातही केली होती. अगदी आदल्या दिवसापर्यंत ते विद्यालयात आपली सेवा बजावत ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येत होते. त्यांच्या निधनाने देवरूख हायस्कूलसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून विद्यार्थी, शिक्षक, पालक व मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे. कालपर्यंत आपण ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वर्गात शिकत होतो. काल त्यांच्याशी वर्गात बोललो आणि हेच आपले लाडके शिक्षक आज अचानक काळाने हिरावून नेले. या दुःखद भावनेनेच अनेक विद्यार्थी पालकांना अश्रू अनावर झाले.

विद्यार्थ्यांनाही अश्रू अनावर

राहुल सप्रेहे जिल्ह्यातील नावाजलेले उत्तम स्काऊट गाईड होते. तसेच ते हिंदी या विषयातीलही उत्तम शिक्षक होते. असंख्य विद्यार्थी त्यांनी आजवर घडवले आहेत. लाडके शिक्षेच्या निधनाची बातमी समजताच अनेक विद्यार्थ्यांनाही अश्रू अनावर झाले. सप्रे सरांनी घडवलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदावरही कार्यरत आहेत. ते अत्यंत शांत, प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे असलेलं व्यक्तिमत्व होतं. ते स्काऊटचे जिल्हा संघटक व शिक्षण क्रांती संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष होते.

Maharashtra TimesRamraje Nimbalkar : जोपर्यंत राजा टिकून, तोपर्यंत खेळ जिवंत, रामराजेंचा इशारा नेमका कुणाला?
केवळ एक उत्तम शिक्षक तर होतेच पण ते जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांच्या हिताबरोबरच शिक्षकांच्या हक्कासाठी सतत धडपडणारे नेहमी प्रयत्न करणारे असं मोठं नेतृत्व होतं. सप्रे यांच्या वडिलांचेही वर्षभरापूर्वीच निधन झालं होतं. त्यांच्या निधनाने सप्रे कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आज शुक्रवारी दुपारी देवधामापूर गावच्या स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चांगल्या नेतृत्वाची पोकळी निर्माण

शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा राहुल सप्रे यांच्यासारखाशिक्षक कार्यकर्ता अचानक निघून गेल्यामुळे, केवळ तालुक्याच्या नव्हे तर जिल्ह्याच्या शिक्षण वर्तुळात चांगल्या नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्ना प्रसंगी सप्रे मदतीसाठी उभे राहत होते. त्यांना नियमावलींची उत्तम माहिती होती. अनुकंपाखाली कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळावी म्हणूनही त्यांनी मोठं काम केलं होतं. त्यांची उणीव यापुढे नेहमीच जाणवत राहील, अशी त्यांच्या कामाची आठवण सांगत भावनिक प्रतिक्रिया संगमेश्वर पैसा फंड हायस्कूलचे ज्येष्ठ कला शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra TimesNagpur News : ‘निमजे साहेबांची बदली झाली’; ऐकताच ऑफिसमध्ये धावपळ, सहकारी मिठी मारुन लेकरासारखे ढसाढसा रडले, तीन वर्ष कुटुंबासारखे राहिले
शिक्षक राहूल सप्रे त्यांच्या पश्चात दोन भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी असा मोठा परिवार आहे. देवरुख येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संघर्ष परिसरातील राजकीय सामाजिक औद्योगिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा