Kanjurmarg to Badlapur Metro: मुंबई मेट्रो लाइन 14चं काम पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. या पूर्वी तयार केलेल्या अहवालात काही त्रुटी आढळल्या असल्यामुळे परत सल्लागार नेमण्याची प्रकिया सुरू झाली आहे.
43.69 किमी लांब मार्गिका
मुंबईतील कांजुरमार्ग ते ठाणे जिल्ह्यातील बदलापूरपर्यंत मेट्रो 14चा मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 43.69 किमी लांबीची ही शहरातील सर्वात लांब मेट्रो असेल. मेट्रोचा मार्ग, प्रवासी संख्येचा अंदाज, डिझाइन आणि आर्थिक व्यवहार्यतेमध्ये आयआयटी मुंबईने काही सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय या संपूर्ण परिसरात सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांची नोंद घेऊन या मेट्रोचा मार्ग निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता नवीन सल्लागार नेमून सविस्तर प्रकल्प अहवाल पुन्हा तयार करण्यात येणार आहे.
Mayank Lohar: बोरिवली-पनवेल-मंगळूर… रोशनचा प्लॅन; लोकलमधील घटनेनंतर फरार; शर्टवरील एका ‘लोगो’मुळे पोलिसांच्या ताब्यात
मेट्रो लाइन 14वर सध्या 24 स्थानकं प्रस्तावित आहेत. कांजुरमार्ग-घणसोली- कल्याण-अंबरनाथ असा या मेट्रोचा मार्ग असेल. मुख्य मुंबई शहराला पूर्व महानगर प्रदेशातील वेगाने वाढणाऱ्या उपनगरांशी जोडण्याच्या उद्दिष्याने ही मेट्रो मार्गिका तयार केली जात आहे. मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बर रेल्वेसह अनेक मेट्रो मार्गांसोबत इंटरचेंज तयार केलेल असतील.
नवे सल्लागार काय तपासणार?
नव्या सल्लागारा सात महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे. ई-निविदा प्रक्रियेद्वारे निविदा मागवण्यात आल्या आहे. 7 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे आणि त्यापूर्वी पूर्वतयारीसाठी एमएमआरडीएने बीकेसीमधील मुख्यालयात 3 जुलै रोजी बैठक बोलावली आहे.
मेट्रो लाइन 14च्या मार्गावर खाडीला पार करणारा 3.25 किमी लांब बोगदा आहे. कांजुरमार्ग येथे एक भुयारी स्थानक देखील असेल. 2019मद्ये नियुक्त केलेल्या कपंनीने व्यवहार्यता अहवाल सादर करण्यात आला असून आयआयटी मुंबईने त्याचा आढावा घेतला. यावेळी अनेक भागांमध्ये सुधारणांची गरज असल्याचं संस्थेनं स्पष्ट केलं. नवीन सल्लागार मार्गावरील बोगदा, उन्नत मार्ग या दोन्ही विभागांचं संरेखन निश्चित करणं, स्थळ, तांत्रिक आणि भौतिक तपासणी करणं, परिसरातील रहदारी, प्रवाशांची संभाव्य संख्या, खर्चाचा अंदाज आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या मॉडेल अंतर्गत हा प्रकल्प राबविला जाऊ शकतो का या सर्व गोष्टींचा तपास करतील.
Mumbai to Navi Mumbai Metro: मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 30 मिनिटांत! गोल्ड लाइनसाठी ‘सिडको’कडून हालचाली सुरू; कुठे असतील स्थानकं?
कोणत्या प्रकल्पांचा अभ्यास होणार?
मेट्रो धावेल त्या मार्गावर विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर, प्रस्तावित ऐरोली-कटाई नाका मार्ग, कल्याण रिंग रोड , घणसोली ट्रान्स हार्बर कॉरिडोर आणि कल्याण-बदलापूर पट्ट्यातील अनेक उड्डाणपूल आणि रस्ते प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा आढाव घेऊन अहवाल आणि आराखडा तयार करण्याची गरज आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भविष्यात तयार होणाऱ्या मार्गांच्या अहवालांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासह शिळफाटा ते भिवंडी येथील राजनोळी जंक्शनदरम्या प्रस्तावित 21 किमी उड्डाणपुलाच्या मार्गाचीही अभ्यास केला जाईल. तसचं, मेट्रो लाइन 4, 12 आणि 12 अ सोबत इंटरचेंज तयार करण्याचाही विचार आहे.
