• Thu. Jun 25th, 2026
    एसी लोकलमध्ये फुकट प्रवासासाठी नवा जुगाड! बनावट ॲपने बनवलं तिकीट; पण एका चुकीमुळे फसला

    Local Ticket Fraud Alert: एसी लोकलमधून फुकट प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी बनावट तिकीट किंवा जुन्या स्क्रीनशॉटचा वापर करतात. आता एका प्रवाशांने चक्क यूट्यूब व्हिडिओच्या सहाय्याने रेलवनसारख्या बनावट अॅपच्या मदतीने तिकीट बनवलं

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमध्ये बनावट डिजिटल तिकीटाद्वारे प्रवास करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, फॉण्ट आणि लेआउटमधील सूक्ष्म फरकामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी ही फसवणूक उघड केली. विरार-चर्चगेट मार्गावरील एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या शेख फैजल (पूर्ण नाव पडताळणी सुरू) याला रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे.

    ही घटना शुक्रवारी २० जून रोजी दुपारी ३.२४ वाजता दादरहून सुटलेल्या एसी लोकलमध्ये घडली. पश्चिम रेल्वेचे मुख्य तिकीट निरीक्षक अरविंद कुमार तिकीट तपासणी करत असताना आरोपी प्रवासी पत्नी आणि मुलासह प्रवास करत होता. तिकीट विचारल्यानंतर प्रवाशाने मोबाइलमध्ये विरार-चर्चगेट परतीचे एसी तिकीट दाखवले.

    Maharashtra TimesMaharashtra Weather: पहिल्याच पावसात रस्ते-रुळांवर पाणी तुंबलं, महाराष्ट्राला मुसळधार पावसानं झोडपलं; मुंबईसह 7 जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

    कसं बनवलं बनाट तिकीट?

    तिकीट तपासताना अधिकृत रेल्वे अ ॅपमधील तिकिटांच्या तुलनेत फॉन्ट आणि डिझाइनमध्ये फरक आढळल्याने निरीक्षकांना संशय आला. त्यांनी हँडहेल्ड मशीनद्वारे तिकीट क्रमांकाची पडताळणी केली असता, ते तिकीट १८ जून २०२६ रोजी जारी केलेल्या द्वितीय श्रेणी तिकिटाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने मोबाइल स्क्रीनमध्ये फेरफार करून त्याच क्रमांकावर एसी रिटर्न तिकीट असल्याचे भासवले होते. चौकशीत आरोपीने यूट्यूबवरील लिंकद्वारे डाउनलोड केलेल्या बनावट अ ॅपच्या मदतीने खोटे डिजिटल तिकीट तयार केल्याची कबुली दिली असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. पश्चिम रेल्वेने सर्व पुरावे गोळा करून वांद्रे रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

    मशीनद्वारे तपास

    मोबाइल स्क्रीनवरील तिकिटावर गंतव्य स्थानक, प्रवासाची तारीख, अंतर, प्रवाशांची संख्या यासारखे रेलवन अॅपवर दिसणारे सर्व पर्याय दिसत होते. सर्व माहिती भरल्यावर रेलवनच्या हुबेहूब रेलवनच्या तिकीटासराखं दिसणारं तिकीट दिसत होतं. रेल्वे प्रशासनाने डिजिटल तिकिटांची तपासणी हँडहेल्ड मशीनद्वारे तत्काळ केली जात असल्याने अशा प्रकारचे फसवणूक प्रकार उघडकीस येत असल्याचे सांगितले आहे. प्रवाशांनी अधिकृत अॅपद्वारेच तिकीट खरेदी करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

    Maharashtra TimesST Bus Employee Salary Hike : कर्मचारी समाधानी तरच लालपरी सक्षम; एसटी बस कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, महागाई भत्त्यासह अनेक भत्त्यांमध्ये वाढ

    रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते बनावट रेल्वे तिकीटांसाठी हा अॅप तयार केला असावा. अधिकाऱ्यांसह रेल्वे प्रवाशांचीही या अॅपमुळे दिशाभूल होत असल्याची चिंता व्यक्त केली गेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचं अॅप वापरून पश्चिम रेल्वेशिवाय इतर सेवांवर अधिकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे का याचा तपास अधिकारी करणार आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा