• Thu. Jun 25th, 2026
    ST Bus Employee Salary Hike : कर्मचारी समाधानी तरच लालपरी सक्षम; एसटी बस कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, महागाई भत्त्यासह अनेक भत्त्यांमध्ये वाढ

    ST Employee Salary Hike Pratap Sarnaik : ‘आजचा निर्णय हा केवळ वेतनवाढीचा नाही, तर विश्वास, सन्मान आणि मानवी संवेदनांचा विजय आहे. एसटीच्या प्रत्येक चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा सरकारने केलेला हा योग्य गौरव आहे. कर्मचारी समाधानी असतील, तरच लालपरी अधिक सक्षमपणे, अधिक विश्वास आणि कार्यक्षमतेने महाराष्ट्राच्या प्रत्येक गावापर्यंत धावेल’, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.

    एसटी बस कर्मचारी पगारवाढ प्रताप सरनाईक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून केली.

    लालपरीची राज्याच्या कानाकोपऱ्यात अविरत सेवा

    सरनाईक म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, एसटीच्या सर्व कामगार संघटनांची सोमवारी बैठक घेण्यात आली. गेल्या आठ दशकांपासून लालपरी राज्याच्या कानाकोपऱ्यात अविरत सेवा बजावत आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

    Maharashtra TimesMaharashtra Weather: पहिल्याच पावसात रस्ते-रुळांवर पाणी तुंबलं, महाराष्ट्राला मुसळधार पावसानं झोडपलं; मुंबईसह 7 जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

    कोणकोणत्या भत्त्यात वाढ?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय्य अपेक्षांचा आदर करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के, घरभाडे भत्ता ८-१६-२४ टक्क्यांवरून १०-२०-३० टक्के आणि वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्क्यांवरून तीन टक्के केला आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून ५,६४९ कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

    नेमून दिलेल्या हॉटेलांवर एसटी न थांबल्यास दंड

    एसटीच्या भरारी पथकाने महामार्गावरील एसटी महामंडळाने नेमून न दिलेल्या हॉटेलांवर बस उभ्या करणाऱ्या १३१ बसवर कारवाई केली आहे. दोन महिन्यांत केलेल्या या कारवाईतील एसटी बस राज्याच्या विविध भागांतील आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे वसूल केले जाणार आहेत.

    चालकांवर कारवाईचा इशारा


    एसटीचालक महामार्गावर कोणत्याही हॉटेलवर थांबून फक्त स्वतःचाच फायदा पाहत होते. हॉटेल चालकाकडून प्रवाशांची लुटमार करण्यात येत होती. अशा तक्रारी वाढल्यानंतर एसटी प्रशासनाने प्रत्येक मार्गावर अधिकृत हॉटेलची नेमणूक केली. त्यांना प्रवाशांकडून नाश्ता, जेवणासाठीचे दर निश्चित करून दिले; तसेच त्या ठिकाणी स्वच्छता व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परवानगी नसलेल्या हॉटेलवर बस उभ्या करणाऱ्या चालकांवर कारवाईचा इशारा दिला होता. तरीही चालकांकडून फायद्यासाठी परवानगी नसलेल्या हॉटेलवर बस उभ्या केल्या जात आहेत. अशा बसवर भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी पुणे विभागाची सहा पथके कार्यरत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा