Lohagad Ketan Agarwal Death Case : अगरवाल आणि गोयल कुटुंबाची गुलबर्गा, कर्नाटक येथे समाजातील एका लग्नात नातेवाईकांनी ओळख करुन दिली होती.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी लोणावळा : मावळातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला आलेल्या केतन अगरवालचा नियोजित बायको सिया गोयल हिनेच प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने कडेलोट केल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमध्येही खळबळ उडाली आहे. या प्रकरणी केतन अगरवालचे वडील विशाल अगरवाल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सिया प्रविण बसेसर गोयल हिच्याविरुद्ध तक्रार केली. अगरवाल कुटुंबाने सुरुवातीला गोयल कुटुंबाशी सोयरीक नाकारली होती, अशी माहिती आता समोर आली आहे.
कर्नाटकातील लग्नात ओळख
केतन विशाल अगरवाल आणि सिया प्रविण बसेसर गोयल यांचे नातेवाईकांच्या मध्यस्थीने लग्न ठरले होते. तत्पूर्वी अगरवाल आणि गोयल कुटुंबाची गुलबर्गा, कर्नाटक येथे समाजातील एका लग्नात नातेवाईकांनी ओळख करुन दिली होती. यावेळी केतन आणि सिया यांच्या लग्नाचा विषय काढण्यात आला. Pune Crime : 2004 वेळा फोनाफोनी, 238 तास गप्पा; केतनशी लग्न ठरल्यानंतरही चेतनशी लगट, सियाच्या CDR मुळे चक्रावणारी माहिती समोर
कमी वयामुळे लग्नाचा प्रस्ताव नाकारलेला
सियाचं वय जेमतेम वीस वर्ष असल्यामुळे अगरवाल कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता, परंतु नंतर गोयल कुटुंबीयांच्या आग्रहाखातर ते तयार झाले. काही दिवसांतच दोघांच्या लग्नाची बोलणी झाली आणि १९ फेब्रुवारीला त्यांचा साखरपुडा झाला होता. तसेच २५ नोव्हेंबरला राजस्थान येथे विवाह होणार होता. त्यासाठी तेथील हॉटेल किंवा महल, हॉल यांची पहाणी सुरु होती.
गोयल-अगरवाल कुटुंबाची जवळीक वाढली
साखरपुड्यानंतर गोयल कुटुंबीय अगरवाल यांच्या घरी वारंवार येऊ लागले. इतकेच काय, तर सिया त्यांच्यासोबत कौटुंबिक सहलींनाही जाऊ लागली. “आम्ही सुरुवातीपासूनच तिच्यावर विश्वास ठेवला होता. आम्हाला कधीच कशाबद्दल शंका आली नाही” असे केतनचे वडील म्हणाले.
VIDEO | एकनाथ शिंदेंच्या सभागृहातील एन्ट्रीवेळी नेमकं काय घडलं?
सिया-चेतनचं प्लॅनिंग
सिया हिला केतन अगरवाल बरोबर होणारे लग्न मान्य नव्हते, केतन बरोबरचे लग्न हा सिया आणि चेतन चौधरी यांच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने ते दोघेही त्रस्त होते. हे लग्न कसे मोडायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. अखेर त्यांनी प्रेमात अडथळा ठरत असलेल्या केतनलाच दूर करण्याची योजना आखली. Siya Goyal : सियाने लोहगडाच्या टोकावरुन ढकललं, केतनने पडता-पडता एका झुडपाला घट्ट पकडलेलं, पण… वडिलांचा दावा, घटनास्थळाचा पहिला फोटो समोर लग्न ठरल्यानंतर सियाने केतनला वारंवार फोन करून फिरायला नेण्यासाठी विनवणी करायची. होणाऱ्या बायकोच्या विनंतीला मान देत केतन तिचा हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असे. परंतु त्याला सियाच्या कुटीलतेची पुसटशी कल्पनाही नव्हती. सिया त्याला नेहमीच लोहगडावर फिरायला जायचे असा हट्ट करायची, त्यामुळेच ते दोन वेळा फिरायला गेले होते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा