अन्न आणि औषध प्रशासनाकडून पुणे आणि नागपुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नागपुरात तर बोगस डॉक्टरचा भंडाफोड करण्यात आला आहे. तर पुण्यात नामांकीत कॉस्मेटिक कंपनीचे बनावट उत्पादन आढळले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरुच आहे. विशेष म्हणजे नागपुरात एका बोगस डॉक्टरचा भंडाफोड झाला आहे. त्याच्याकडे 1 लाखांचे औषध जप्त करण्यात आले आहे. तर पुण्यात नामांकित Cosmetic बॅन्ड Cetaphil चे बनावट उत्पादन जप्त करण्यात आलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार, अधिकाऱ्यांनी केलेल्या या कामाचे कौतुक होत आहे. या दोन्ही कारवायांची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नागरिकांना उच्च गुणवत्तेची, सुरक्षित औषधे आणि सौंदर्यप्रसाधने मिळावीत यासाठी अन्न व औषध प्रशासन दक्षता बाळगत आहे. बेकायदेशीर औषध विक्री, बनावट औषधे आणि दिशाभूल करणाऱ्या औषधे व सौंदर्यप्रसाधने उत्पादनांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. त्याच अनुषंगाने अन्न-औषध प्रशासनाकडून नागपूर आणि पुणे येथे करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये गंभीर स्वरूपाचे उल्लंघन उघडकीस आले आहे.
नागपुरात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
22 जूनला नागपूर जिल्ह्यातील कोथुळना, ता. सावनेर, येथे बोगस डॉक्टरद्वारे संचालित प्राथमिक सामुदायिक इलेक्ट्रो होमिओपॅथिक उपचार केंद्रामध्ये विना परवाना औषध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सदर केंद्राची तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित ठिकाणी विना परवाना मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथिक औषधसाठा आढळून आला.
केंद्राचे मालक तथा बोगस डॉक्टर मोनिदीप सरकार यांच्याकडे औषधांच्या खरेदीची कागदपत्रे मागविण्यात आली असता त्यांनी कोणतीही खरेदी बिले सादर केली नाहीत. तसेच वैध औषध विक्री परवाना नसताना विक्रीसाठी औषधांची खरेदी, साठवणूक आणि विक्री केल्याचे निदर्शनास आले.
लाखाचा औषधसाठा जप्त
या प्रकरणी औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, 1940 मधील कलम 18(C), 18A तसेच नियम, 1945 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने 1,07,000 रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त औषधांमध्ये प्रामुख्याने Antibiotics, Antifungal (Ketoconazole), Injections आणि Multivitamins यांचा समावेश आहे.
पुण्यात काय कारवाई करण्यात आली?
गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे कार्यालयाने सौदर्यप्रसाधनांची तपासणी केली असता, Cetaphil या प्रसिद्ध ब्रँडचे Cetaphil Gentle Skin Cleanser (118 ml), बॅच क्रमांक B5NA1110, हे सौंदर्यप्रसाधने मूळ उत्पादक आणि विपणनकर्ता कंपन्यांनी केलेल्या पडताळणीत सदर उत्पादन त्यांच्या अधिकृत उत्पादन प्रक्रियेतून तयार झालेले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हे उत्पादन “स्प्युरियस कॉस्मेटिक” (बनावट सौंदर्यप्रसाधन) असल्याचे निश्चित करण्यात आले.
पुण्याच्या कारवाईतही गुन्हा दाखल
या निष्कर्षांच्या आधारे दिनांक 22 जूनला पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मे. ओम केमिस्ट या विक्रेत्याकडून सदर बनावट सौंदर्यप्रसाधनाचा एकूण 5,508 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, 1940 मधील तरतुदींनुसार करण्यात आली.
तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे पुण्याच्या चतुःशृंगी पोलीस स्टेशन येथे 22 FIR नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 318(4), 336 (3) आणि 340 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम मुंढे यांची प्रतिक्रिया काय?
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या दोन्ही कारवायांवर प्रतिक्रिया दिली आहे. “नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि विश्वासार्ह औषधे व सौंदर्यप्रसाधने उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बनावट किंवा बेकायदेशीर उत्पादनांच्या व्यवहारात सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा