• Thu. Jun 25th, 2026

    Thane Action : अनधिकृत बांधकामांवरुन नगरसेवक तापले; महापालिका आयुक्त म्हणाले, कुणालाच सोडणार नाही

    Thane Action : अनधिकृत बांधकामांवरुन नगरसेवक तापले; महापालिका आयुक्त म्हणाले, कुणालाच सोडणार नाही

    ठाणे महापालिकेकडून अनधिकृत गोदमांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईवरुन ठाण्यात राजकारण तापलं आहे. पालिका आयुक्तांनी सर्वच ठिकाणी टप्प्याटप्प्याने ही कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे : शिळफाटा, खिडकाळी परिसरातील अनधिकृत गोदामांवर व्यापक तोडक कारवाई सुरु असताना ठाणे शहराच्या इतर भागात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांना अभय दिला जात असल्याचा मुद्दा सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी झालेल्या महासभेत अधोरेखित केला. कारवाई करताना दुजाभाव होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी करताच येत्या काळात शहरामधील सर्वच अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सूचित केले. शिळप्रमाणेच येऊर, ओवळा, खारेगाव पट्ट्यातील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा उगारण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केल्याने कारवाईच्या भीतीने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

    शिळ, लकी कंपाऊंड आणि आसपासच्या परिसरात अनधिकृतरित्या गोदामे उभारण्याचा सपाटा लावल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नगरसेवक बाबाजी पाटील यांनी गेल्या आठवड्यात महासभेत केला होता. ग्रीन झोन, उद्यान आरक्षण आणि शैक्षणिक आरक्षणाच्या जागांवर मोठ्या प्रमाणात गोदामे उभी राहत आहेत.

    3 दिवसांत 217 अनधिकृत गोदामांवर कारवाई

    बाबाजी पाटील यांनी कारवाईची मागणी करताच महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशानुसार उपायुक्त (अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन) जितेंद्र निकम, उपायुक्त (परिमंडळ – १) दीपक झिजांड व दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या उपस्थितीत तीन दिवसांत तब्बल २१७ अनधिकृत गोदामांवर निष्कसनाची कारवाई करण्यात आली. तर ८३० गोदामांचे सर्वेक्षण करण्यात आले.

    नजीब मुल्ला यांचा गंभीर आरोप

    ही कारवाई करताना विशिष्ट वर्गाला लक्ष्य केले जात असून शहरातील इतर भागात अशाच पद्धतीने कारवाई का होत नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. तसेच मानपाडा येथे पब, हुक्का पार्लर व फर्निचर गोदाम थाटलेल्या कोठारी कंपाउंड येथे कारवाई केली जात नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) नगरसेविका मार्जिया पठाण यांनी उपस्थित केला.

    आयुक्त सौरभ राव यांचे स्पष्टीकरण

    या आरोपांना उत्तर देताना आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले की, नागरिकांची सुरक्षा हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोणतेही बांधकाम अथवा गोदाम नियमबाह्य असल्यास त्यावर कारवाई होणारच. कोणत्याही एका भागाला लक्ष्य करण्याचा प्रश्न नसून, शहरातील सर्व अनधिकृत बांधकामांची माहिती संकलित करून टप्प्याटप्प्याने कारवाई केली जात आहे, असे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.

    Yeur Action
    येऊर येथील कारवाई

    नवा ‘बेकायदा पॅटर्न’ अधोरेखित

    मुंबई – नाशिक महामार्गालगत खारेगाव भागात एका पेट्रोल पंपाला खेटून अनधिकृत गोदामे उभी राहत आहेत. नव्या कोस्टल रस्त्याच्या नजीक तसेच घोडबंदर रोड येथील ओवळा भागातही बेकायदा चित्रपट स्टुडिओ उभे राहत असल्याचा धक्कादायक आरोप नजीब मुल्ला यांनी केला. या बांधकामांच्या अनुषंगाने आगीच्या किंवा दुर्घटनेच्या घटना घडताना त्या कायदेशीर व बेकायदेशीर बांधकामांचा भेद करत नाहीत. त्यामुळे संभाव्य धोका असलेल्या प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला हस्तक्षेप करावाच लागणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा