• Thu. Jun 25th, 2026

    प्री-वेडिंग शूट अन् पासपोर्ट ‘गायब’; केतनला लोहगडावर संपवणाऱ्या सियाचा आणखी एक कारनामा समोर

    प्री-वेडिंग शूट अन् पासपोर्ट ‘गायब’; केतनला लोहगडावर संपवणाऱ्या सियाचा आणखी एक कारनामा समोर

    Pune Crime: परदेशातून शिकून पुण्यात परतलेल्या २४ वर्षीय केतन अग्रवालचा लोहगडावरुन पडून शेवट झाला. ३५० फूट खोल दरीत दरीत पडल्यानं त्याचा जीव गेला. या प्रकरणात त्याच्या होणाऱ्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तिनं गुन्ह्याची कबुलीदेखील दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेला २४ वर्षीय केतन अग्रवालचा सेल्फी काढताना मृत्यू झाल्याची बातमी चार दिवसांपूर्वी समोर आली. पण हा मृत्यू अपघात नसून घातपात नसल्याचं पोलिसांच्या तपासातून उघडकीस आलं. केतनची होणारी पत्नी सिया गोयलनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं केतनला संपवलं. पोलिसांनी सिया आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं असून त्यांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

    केतन अग्रवाल १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरुन ३५० फूट खोल दरीत पडला. सोसाट्याचा वारा आल्यानं सेल्फी काढताना केतनचा पाय घसरल्याचं सियानं कुटुंबियांना सांगितलं. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद केली. केतन नियमित ट्रेकिंगला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. केतननं याआधी अनेकदा ट्रेक केले होते. त्यामुळे त्याचं पाय घसरुन पाडणं संशयास्पद होतं. केतनच्या कुटुंबियांनी शंका उपस्थित करत पोलीस तक्रार दाखल केली.
    Maharashtra TimesPune Crime: फुलप्रूफ प्लान BFच्या एका चुकीनं फसला अन् सिया अडकली; ‘त्या’ फुटेजनं केतनच्या मृत्यूचा उलगडा
    पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे गोळा करत तपास सुरू केला. सीडीआर, आयडीपीआर काढण्यात आले. त्यातून महत्त्वाची माहिती हाती लागली. सियाचे पुणे मार्केट परिसरात दुकान असलेल्या चेतन चौधरीशी वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं. प्रेमसंबंधात केतन अडथळा ठरत असल्यानं दोघांनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. १९ जूनला सियाचा वाढदिवस होता. त्याच्या आदल्या दिवशी सिया आणि केतन ट्रेकला गेले होते. तिथे एका निर्जन कड्यावरुन केतनला ढकलून देण्यात आलं. आसपास कोणी नसल्याचं पाहून सिया आणि चेतननं केतनला संपवलं. याची कबुली त्यांनी पोलीस चौकशीत दिली.
    Maharashtra TimesPune Crime: ट्रेकिंग, सेल्फी अन् निसर्गाचं ‘कव्हर’; सियानं केतनचा ‘राजा’ केला; 5 चक्रावून टाकणारे योगायोग
    पोलीस तपासातून बरीच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात केतन आणि सिया प्री-वेडिंग फोटोशूटसाठी इंडोनेशियातील बालीला जाणार होते. त्यासाठी ते पुण्यातून मुंबई विमानतळाच्या दिशेनं रवाना झाले होते. पण विमानतळावर पोहोचताच केतनचा पासपोर्ट गायब असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांना बाली दौरा रद्द करावा लागला. केतन सोबत बालीला जावं लागू नये म्हणून सियानं स्वत:च त्याचा पासपोर्ट चोरुन लपवून ठेवला होता.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा