Pune Crime : लोहगड किल्ल्यावरुन 400 फूट खोल दरीत पडल्यामुळे पुण्यातील 24 वर्षीय तरुण केतन अग्रवालचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे.
केतन अग्रवाल लोहगड हत्या प्रकरण आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुणे येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी एका भीषण घटनेत 24 वर्षीय व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल याच्या मृत्यूची बातमी समोर आली. या घटनेमुळे त्याचं कुटुंब पूर्णपणे खचलं आहे. सुरुवातीला फोटो काढत असताना डोंगरावरून पाय घसरून केतनचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. मात्र, गेल्या चार दिवसांत या प्रकरणाचा उलगडा झाल्यावर, हा संपूर्ण कट केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने रचला असल्याचं समोर आलं आहे.
केतनला याधाची मारण्याचा प्लॅन
लग्नाच्या तयारीच्या गडबडीत सियाने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी ट्रेकिंगच्या बहाण्याने केतनला लोहगडावर नेलं आणि त्याला 400 फूट खोल दरीत ढकललं. केतनला याची काहीच कल्पना नव्हती की, ज्या होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त त्याने हा प्लॅन केला होता, ती सिया प्रत्यक्षात त्याच्या मृत्यूचा कट रचत होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिचं चेतन चौधरी नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तपासात असं उघड झालं आहे की, सिया तिच्या ठरवलेल्या लग्नामुळे नाखूश होती आणि केतनला ती त्यांच्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा मानत होती. याच कारणामुळे त्यांनी केतनला संपवण्याचा कट रचला. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येचा कट एका रात्रीत रचला गेला नव्हता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 14 जून रोजी लोहगड किल्ल्याजवळ केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचा तोल जाण्यासाठी त्याला सापाची भीती दाखवण्यात आली होती. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. Pune Crime : महाराष्ट्रातील सोनम; काही महिन्यांवर लग्न, लोहगडावरुन होणाऱ्या नवऱ्याला ढकलून संपवलं, केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सियाची इन्स्टा पोस्ट चर्चेत
सियाने तिचा बालीचा प्लॅन रद्द केला
केतनच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो सियाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता आणि लग्नाबद्दल खूप उत्सुक होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, लग्नापूर्वी या त्यांच्यासाठी बालीच्या सहलीचं नियोजन करण्यात आलं होतं, परंतु सियाने तिचा पासपोर्ट हरवल्याचं सांगून तो प्लॅन रद्द केला. नंतर, तपासात असं उघड झालं की तिने स्वतःच तिचा पासपोर्ट फाडला होता. कुटुंबीयांनी असंही सांगितलं की, केतनने सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महाबळेश्वरमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये एका भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं. Pune Crime : केतनला लोहगडावरुन ढकलण्याचा प्रयत्न फसला, तर 20 वर्षांच्या सियाचा प्लॅन B ठरलेला; अंतःकरणापासून शाप देतोय, पित्याची भावूक पोस्ट
लग्न जयपूर पॅलेसमध्ये होणार होते
दरम्यान, लोहगड किल्ल्यावर प्री-वेडिंग फोटोशूट करण्याची कल्पनाही सियानेच मांडली होती. आता पोलिसांचा तपास हत्येच्या कटाकडे निर्देश करत असल्यानं, कुटुंब मोठ्या धक्क्यात आहे. केतन ज्या नात्याला नव्या आयुष्याची सुरुवात मानत होता, तेच त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा