• Sun. Aug 16th, 2026

FDA inspect School Canteen Menu : विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील एफडीए विभागाने शाळांच्या कॅण्टीनमधून फास्ट फूड हद्दपार करून पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ( एफडीए ) शाळांच्या कॅण्टीनमधून फास्ट फूड हद्दपार करून पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. केवळ निर्बंध घालण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता राज्यातील तसेच मुंबईतील ३०० शाळांमध्ये अन्नसुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यासही प्रशासनाने सुरुवात केली आहे. शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड, अतिरिक्त साखर आणि मीठ असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आवश्यक पोषण, खाद्यपदार्थांची निवड आणि स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.

शाळांना प्रशिक्षण

विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांना आहारातील कोणत्या घटकांची गरज असते, कोणत्या अन्नपदार्थांमधून त्यांचे पोषण पूर्ण होऊ शकते, खाद्यपदार्थ तयार करताना कोणती काळजी घ्यावी आणि स्वच्छतेच्या कोणत्या निकषांचे पालन करावे, याबाबत शाळांना प्रशिक्षण दिले जात आहे. अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शाळांच्या अंतर्गत पोषण समित्यांना आवश्यक मार्गदर्शन केले जात आहे.

Maharashtra TimesSuresh Gowda : भाजप नेत्याच्या लेकीची महिला PSI ला कानशिलात, मंदिरातील दर्शनावरुन वाद, आमदार पित्याचा माफीनामा

कॅण्टीन बंद ठेवण्याचा निर्णय

विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा आणि कॅण्टीनमध्ये आरोग्यदायी खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी शाळांच्या पोषण समित्यांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. काही शाळांनी फास्ट फूडला रामराम करत कॅण्टीनमध्ये आरोग्यदायी पदार्थ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. तर काही शाळांनी नियोजन पूर्ण होईपर्यंत कॅण्टीन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कॅण्टीनच्या मेन्यूमध्ये केलेल्या बदलांची माहिती शाळांनी प्रशासनाला देणे बंधनकारक आहे.

ज्या शाळांनी कॅण्टीनच्या मेन्यूमध्ये बदल केले आहेत, त्यांनी तो बदल कशा पद्धतीने केला, त्यांना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर कशी मात केली, याची माहिती इतर शाळांना देण्याचे आवाहन ‘एफडीए’कडून करण्यात आले आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना 10-15 वर्ष तर FDA मध्ये ठेवू शकत नाही, योगेश कदमांची खंत, आयुक्तांच्या बदलीच्या चर्चांवर मोठं भाष्य

चविष्ट आणि आकर्षक पदार्थांवर भर

विद्यार्थ्यांना कोणते पदार्थ आवडतात, फास्ट फूडची सवय असल्यास ती सोडण्यासाठी किती कालावधी लागू शकतो आणि पौष्टिक पदार्थ मुलांना रुचकर वाटतील यासाठी पाककृतीचे नियोजन कसे करावे, याबाबतही शाळांकडून अनुभव आणि माहिती घेतली जात आहे. फास्ट फूडची सवय असलेल्या विद्यार्थ्यांना अचानक वेगळ्या आहाराची सवय लावणे आव्हानात्मक असल्याने पौष्टिक पदार्थ चविष्ट आणि आकर्षक पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

Maharashtra TimesCrime News : हे घर माझं आहे… तिशीतील दाम्पत्याचा गूढ मृत्यू, मध्यरात्री दीड वाजता आईला पाठवलेल्या व्हॉईस मेसेजमुळे ट्विस्टअशा नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती इतर शाळांनी घ्यावी, परस्परांशी संवाद साधावा आणि यशस्वी पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.