Konkan Railway: दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याच्या मागणीनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सप्रेसी कार्यव्यवहार्यता तपासण्याचे आदेश दिले होते. पण एप्रिलमध्ये दिलेल्या या आदेशांवर अद्याप काहीही पावलं उचललं नाही आहेत
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणातील प्रवाशांसाठी जिव्हाळ्याची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला याची व्यवहार्यता तपासण्याचे आदेश दिले होते. मात्र दोन महिन्यांनहून अधिक काळ लोटल्यानंतरही ही फाईल जागची हलली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या आदेशालाही मध्य रेल्वे प्रशासनाकडून वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या का, असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
पॅसेंजर एक्सप्रेस बंद करण्यामागचं कारण काय?
कोकणवासियांमध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेसला मोठी पसंती होती. दादर रेल्वे स्थानकावर मध्य आणि पश्चिम रेल्वे धावत असल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानक गाठणं सोपं जात होतं. तसचं, कुर्ला स्थानकही दादरवरून काही मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे हार्बर लाइनवरील प्रवाशांनाही पोहोचणं सोपं होतं. परंतु, कोरोना काळात ही ट्रेन बंद करण्यात आली. दादर ऐवजी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती. कोरोना कालावधीत बंद करण्यात आलेली ही गाडी अद्याप पर्यंत सुरू झाली नाही. या एक्सप्रेसमुळे उपनगरिय रेल्वे सेवांमध्ये खोडा निर्माण होतो हे कारण मध्य रेल्वेकडून देण्यात आलं होतं.
Navi Mumbai Metro: नवी मुंबईत दोन मेट्रो मार्गिकांना मंजुरी, प्रकल्पांसाठी ५ हजार कोटींचा खर्च; थेट विमानतळापर्यंत जोडणार
त्यानंतर दादर रेल्वे स्थानकावरून गोरखपूरला जाणारी एक्सप्रेस कायमस्वरूपी सुरू करण्यात आल्यामुळे कोकणवासी संतापले. दादर रत्नागिरी पॅसेंजरचे दिवा रत्नागिरी पॅसेंजर असे रूपांतर करण्यात आलं त्यामुळे थेट कोकणातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दिवा स्थानकात उतरल्यानंतर मोठ्या त्रासाचा सामना करत मुंबई गाठावी लागते. त्यानंतर प्रवाशांच्या वाढत्या मागण्यांची दखल घेत उपनगरिय सेवांवर परिणाम न होता ही ट्रेन दादर रेल्वे स्थानकावरून कशी सोडता येईल हे पाहण्याचे आदेश दिले होते. पण यावरती अजूनपर्यंत हालचाली सुरू न झाल्यामुळे कोकणवासी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत आहेत.
Navi Mumbai News: नवी मुंबईत रेल्वे स्थानकांचा विकास होणार, तीन स्थानकं ‘सिडको’कडून मध्य रेल्वेच्या ताब्यात; कुठे-कसा होणार फायदा?
प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त
रत्नागिरी दादर पॅसेंजर रद्द करून ‘दादर-गोरखपूर’ ट्रेन कायमस्वरूपी सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने तत्परता दाखवण्यात आली. मात्र कोकणवासीयांच्या हक्काच्या गाडीबाबत मात्र उदासीनता कायम ठेवली. यामुळे मध्य रेल्वेचा दुजाभाव उघड झाल्याची भावना प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनांकडून रत्नागिरी दादर पॅसेंजर सुरू करण्यासाठी अनेकदा आजवर प्रयत्न करण्यात आले. अनेकदा मध्य रेल्वे प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना निवेदनही देण्यात आली. मात्र त्याची कोणतीही दखल अद्याप घेण्यात न आल्याने प्रवासी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा