Sanjay Raut and Sanjay Dina Patil : संजय दिना पाटील यांनी ‘माझ्या नादाला लागणाऱ्यांना स्मशानात पाठवेन’, अशी धमकी दिली होती. आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
संजय राऊत ऑन संजय दिना पाटील धमकी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर आपल्या विरोधकांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं. ‘माझ्या नादाला लागाल तर, एकतर हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, नाहीतर स्मशानात. आम्हाला पोलिसांच्या सुरक्षेची गरज नाही. आमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात’, असं म्हणत संजय दिना पाटील यांनी हाताने बंदुकीची ॲक्शन करत ‘ऑपरेशन तुडवा’च्या तयारीत असलेल्या आपल्या विरोधकांना इशारा दिला होता. याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्यावर पलटवार गेला. ते आज पत्रकार परिषेदत बोलत होते.
‘आता नाव घेऊन बोलतोय मी’
खासदार संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ‘चल मी तुझ्या नादाला लागतो. बंदुका वगैरे आम्हाला दाखवू नको आम्हाला संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी, मी इथेच भांडूपला आहे, बंदूक काय दाखवतो. शिवसैनिकांना बंदूक दाखवतो, गद्दार माणूस. गद्दारी केले 50 कोटी गिळलेत ना, मग गप्प बसायचं, बंदुकीची भाषा करायची नाही’, असं संजय राऊत यांनी म्हटले. ‘संजय दिना पाटील यांना पक्षातील कोणत्या नेत्याविषयी तक्रार होती, त्यांनी मातोश्रीवर येऊन सांगायला हवे होते. तो कोण नेता हे मला माहिती नाही. आता त्यांनी पक्ष सोडला’, असेही संजय राऊत यांनी म्हटले. Kiran Pawaskar : दुसऱ्यांना सांभाळा, मुलाला सांभाळा, पाळणाघर आहे का? पावसकरांनी शिंदेंसमोरच बाळासाहेबांची खिल्ली उडवली, नंतर शिवसेनेने हात झटकले
‘ऑपरेशन तुडवा’वर नागेश पाटील आष्टीकरांचं ओपन चॅलेंज
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ‘ऑपरेशन तुडवा’ या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट आणि थेट शब्दात आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काल शिंदे गटात झालेल्या भव्य स्वागतानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर जोरदार प्रतिक्रिया दिली. Pune Crime : ‘आम्ही खूप फोन केले, पण…’; पुण्यात प्रसिद्ध व्यावसायिकाच्या ऑफिसवर मध्यरात्री गोळीबार, बिश्नोई गँगचा कारनामा
नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले?
यावेळी त्यांनी काही नेत्यांच्या नावांचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे टीका केली. ‘काहीजण स्वतःला मोठे समजतात, पण त्यांची राजकीय ताकद जनतेमुळेच आहे. कोणीतरी हिंसक भाषा वापरत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले जाईल’, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ‘कोणात खुमखुमी असेल तर पुढे या, एकदा होऊनच जाऊ द्या, लपून बोलण्यापेक्षा थेट मैदानात या,’ असं आव्हान देत त्यांनी आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली. संघर्ष टाळण्यापेक्षा तो थेट आणि स्पष्ट पद्धतीने सोडवावा, असं नागेश पाटील आष्टीकर यांनी यावेळी सांगितलं.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा