• Sat. Aug 15th, 2026
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

Maharashtra Monsoon Update: मान्सूनचे वारे दाखल; पण पावसाची प्रतीक्षाच

यावर्षी चार जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर कर्नाटक, तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागांत त्याने प्रगती केली. मात्र, अरबी समुद्रातील कमकुवत वारे आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील पुढील वाटचाल दोन आठवड्यांपासून ठप्प होती. रविवारी वातावरणातील अनुकूल बदलांमुळे मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू झाला. सोमवारी कोकणातील अलिबागपर्यंत आणि मध्य महाराष्ट्रात पुण्यापर्यंतचा भाग; शिवाय अलिबाग, निझामाबाद, दंतेवाडा, गया, मुझफ्फरपूर भागही मान्सूनने व्यापला. पुढील ४८ तासांत मुंबईसह राज्याच्या आणखी भागांत तो दाखल होणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed