• Sat. Aug 15th, 2026

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2026

सोलापूर, दि. १५: भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पोलीस विभाग : उत्कृष्ट उल्लेखनीय सेवा पुरस्कार 

पोलीस दलातील उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेबद्दल खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. सहाय्यक पोलीस आयुक्त मनोजकुमार माधवराव यादव, विलास हनुमंत इंगळे, विजयालक्ष्मी सिद्राम कुरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे, पोलीस उप-निरीक्षक दत्तात्रय भिमराव काळे, पोलीस हवालदार नागेश अप्पासाहेब येणपे/556, विनायक विष्णु भानवसे/34, प्रकाश दत्तात्रय निकम/271, अभिजीत सदाशिव कोष्टी/12, महिला पोलीस हवालदार पुनम रामचंद्र डांगे, पोलीस हवालदार रविंद्र किसनराव खजुरे, पोलीस कॉन्स्टेबल इब्राहिम निजाम शेख/1517, रमेश बाबुराव कोगाव/1489, रामेश्वर वैजिनाथ साखरे/1624, वसीग इसाक शेख/1602, हेमंत हनुमंत वाघमारे/1500, सिद्राम गुलाब देशमुख/1466, विशाल वैजिनाथ बोराडे/305, आनंद प्रकाश गडदुरे/1577, संतोष संभाजी वाघमारे/1671, नितीन दत्तात्रय मोरे यांचा समावेश आहे.

पोलीस विभाग : क्रीडा क्षेत्रातील विशेष मान 

दक्षिण आफ्रिकेतील डर्बन ते पीटर मेरीटझबर्ग या दोन शहरांदरम्यान झालेल्या कॉमरेड मॅरेथॉन 2026 स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि पोलीस शिपाई हेमंत वाघमारे/1501 यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पोलीस विभाग : अतिउत्कृष्ट उत्कृष्ट सेवा पदक 

अतिउत्कृष्ट सेवा पदक सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम ताटे यांना प्रदान करण्यात आले. तसेच उत्कृष्ट सेवा पदक सपोनि अनिल गुरुबसप्पा सनगल्ले, सपोनि सोमनाथ जयवंत कदम, पोह दशरथ अर्जुन गोरे, पोह अमृत रोहिदास खेडकर, सपोनि पोपट बबन टिळेकर, पोउपनि सागर निवृत्ती पाटील, मपोउपनि स्नेहल विलास चव्हाण, पोउपनि प्रतापसिंह किसन जाधव, पोउपनि निलेश एकनाथ गायकवाड, पोउपनि रविराज सायबण्णा कांबळे यांना प्रदान करण्यात आले.

शिक्षण क्रीडा विभाग : गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी खेळाडूंचा सन्मान

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळविलेल्या सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यामध्ये इयत्ता 4 थी जि. प. प्रा. शा. तेंडूलकर वस्ती शेवरे ता. माढा येथील जैद जहांगीर तांबोळी, इयत्ता 5 वी जि. प. प्रा. शा. चिंचोली ता. माढा येथील ओम गणेश देवकर, इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक सांगोला विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज ता. सांगोला येथील अर्णव चतुरगुण औताडे, इयत्ता 8 वी पूर्व माध्यमिक इंग्लिश स्कूल म्हेत्रे मंगळवेढा येथील जान्हवी गणेश भोसले यांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंत खेळाडूंनाही गौरविण्यात आले. त्यामध्ये श्रीकांत विजय कोंढारे, कु. श्रावणी प्रताप सूर्यवंशी, प्रमोद वसंत कुनगुलवार, हनुमंत जाधव या खेळाडूंचा समावेश आहे.

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed