Satara Accident: रविवारी पहाटेच्या सुमारास पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून, दोघांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील कसाब गावचे रहिवासी आहेत. देवदर्शनासाठी ते जेजुरीकडे निघाले होते. सातारा परिसरातील डी-मार्टजवळ आले असता, त्यांच्या भरधाव मिनी बसने पुढे जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात पहाटे पावणेपाच वाजता झाला. या दुर्घटनेत स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Trimbakeshwar Temple Nashik: त्र्यंबक मंदिरातील लाडू प्रसाद गायब, मंदिर परिसरात अनेक दिवसांपासून वितरण बंद
ही धडक इतकी भीषण होती, की मिनी बसच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ‘शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम’चे कार्यकर्ते रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमींना आणि मृतांना बाहेर काढले.
जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
Vidhan Parishad Election 2026 Result : रेश्मा काळेंची माघार पथ्यावर, जळगावात भाजपच्या महाजनांचा एकतर्फी विजय, पहिल्याच फेरीत विजयाचा आकडा गाठला
वाहतूक विस्कळित
महामार्गावरील या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे कसाब गावावर शोककळा पसरली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
Milind Narvekar : ‘नार्वेकर कोण लागून गेला?’ भास्कर जाधवांचा बोचरा सवाल, ठाकरे गटात धुसफूस, आता मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट, यांच्या मानसिक त्रासाचा फटका शिवसैनिकांना बसतोय…
तर दुसऱ्या एका घटनेत, महाबळेश्वर-पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात शनिवारी रात्री मेटतळे धबधब्यानजीक लघुशंकेसाठी थांबलेला एक पर्यटक तोल जाऊन सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळला. दैव बलवत्तर म्हणून आणि महाबळेश्वर ट्रेकर्ससह प्रतापगड रेस्क्यू टीमच्या समयसूचकतेमुळे या पर्यटकाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. शनिवारी रात्री पावणेअकरा वाजता ही घटना घडली. पाऊस, दाट धुके आणि अंधारातही रेस्क्यू टीमच्या जवानांनी घटनास्थळ गाठले. पोलिस कर्मचारी दाखल झाल्यानंतर जवानांनी दोरी आणि स्ट्रेचरच्या साह्याने शोधमोहीम सुरू केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जवान जीव धोक्यात घालून दरीत उतरले. काही वेळातच त्यांना पर्यटक जखमी अवस्थेत आढळला. त्याला मोठ्या प्रयत्नांनी स्ट्रेचरवरून वर आणण्यात आले.
