Bhaskar Jadhav on Milind Narvekar : नार्वेकर कोण लागून गेला, असं विचारताना नार्वेकर म्हणजे मला मिलिंद नव्हे, तर राहुल नार्वेकर वाटले, अशी सारवासारव भास्कर जाधव यांनी करण्याचा प्रयत्न केला.
भास्कर जाधव काय म्हणाले?
“पहिली सुरुवात झाली, ती थोडीशी समज-गैरसमजातून. १९ तारखेला षण्मुखानंद हॉलमध्ये आमच्या शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. अनेक जणांना प्रत्यक्ष हॉलमध्ये जायचं होतं, परंतु आत जाणं शक्य नव्हतं. ज्यावेळी माझी गाडी आली, तेव्हा सगळ्या शिवसैनिकांनी मला गराडा घातला आणि विनंती केली, की आम्हालाही सोबत घेऊन चला, म्हणून मी गाडीतून खाली उतरलो. लोकांना समजावत, मीडियाशी बोलत मी हळूहळू गेटच्या आत गेलो.” असं भास्कर जाधव सांगत होते.
Gokul Gite : नाशकात शिंदेसेनेचा गेम, अपक्ष गोकुळ गितेंचा विजयाचा गुलाल; पराभवानंतर शिंदेंची नवी खेळी, एका फोनवर बाजू पालटणार?
“एका महिला पत्रकाराने माझा बाईट सुरु केला होता, त्यादरम्यान कोणाची तरी गाडी आली, आणि तिचा हॉर्न सातत्याने वाजत होता. कारण गाडीसमोर शिवसैनिक प्रचंड गर्दी करुन होते. कारण त्यांना (शिवसैनिक) आतमध्ये जायचं होतं. गाडीसोबत आम्हालाही आत जाऊद्या असा त्यांचा हट्ट होता. बराच वेळ हॉर्न वाजत होता. एकदाचा दरवाजा उडाला आणि गाडीसोबत आत येण्याच्या प्रयत्नात पाच-पंचवीस शिवसैनिक पडले. त्यामुळे मी सहज, नॅचरली विचारलं की कोणाची गाडी आहे, तर त्या मॅडम म्हणाल्या नार्वेकरांची गाडी.” असं ते पुढे म्हणाले.
‘राहुल नार्वेकर डोक्यात बसलेले’
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे माझ्या डोक्यात बसलेले आहेत. त्यांची कामकाज करण्याची पद्धत ही माझ्या प्रचंड डोक्यात बसलेली आहे. त्यामुळे नार्वेकर म्हणताच कुठले नार्वेकर हे मला फार क्लिक झालं नाही. त्यामुळे एका क्षणात बोलून गेलो की नार्वेकर असलं तर काय झालं. एवढी गर्दी असली, तर आमच्यासारख्या नेत्यांनी लोकांबरोबर चाललं पाहिजे, हा माझ्या बोलण्याचा हेतू होता. म्हणून (मिलिंद) नार्वेकरांना माझा ‘कोण नार्वेकर?’ हे शब्द खटकले असावेत. नार्वेकरांना मी कणखर समजतो. त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांची गाडी समजून मी हे विधान केलेलं नाही, कारण ते माझे मित्र आहेत.
भास्कर जाधव मिलिंद नार्वेकरांवर चिडले; मुख्यमंत्र्यांनी डिवचताच एकनाथ शिंदेंनी काय केलं?
‘नार्वेकरांनी मनावर घेतलं तर विरोधीपक्ष नेता होईन’
मिलिंद नार्वेकरांनी जे ट्वीट केलं, त्यानुसार सगळ्या पक्षातील संबंधांचा उपयोग जर ते मला विधानसभेचा विरोधीपक्ष नेता म्हणून करुन घेण्यास मुख्यमंत्र्यांना विनंती करत असतील, तर मला आनंदच आहे. मला विरोधीपक्ष नेता न केल्याने काहीतरी कोणाला त्रास होतोय, तर तो माझे मित्र मिलिंद नार्वेकर यांनाच होत आहे, कारण त्यामुळे महाराष्ट्राची अडचण होतेय, हे त्यांना जाणवतंय. त्यामुळे आमचं भांडण काही नाही, आता माझ्या अपेक्षा वाढल्यात, की मिलिंद नार्वेकरांनी मनावर घेतल्याने माझी लवकर निवड होईल, अशी आशा भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
Omraje Nimbalkar : मी त्यांच्या ऊरावर बसणार आहे… ओमराजे निंबाळकरांचा एल्गार, ठाकरेंना जय महाराष्ट्र करताना कारणं सांगितली
‘नार्वेकर एवढे हळवे असतील वाटलं नव्हतं’
हा इझिली घेण्यासारखा विषय आहे, आम्ही मित्र आहोत, आता अडीच वाजता मीटिंगला भेटू, पण ते इतके नाजूक असतील, हळवे असतील, हे त्यानिमित्ताने कळलं, की त्यांना असह्य झालं, सहन झालं नाही. मैत्री तेवढी असल्याने ते हळवे झाले. मी कोण नार्वेकर म्हटल्याने हळवे झाले. ते मला फ्रस्ट्रेट म्हणूदेत, असंही जाधव म्हणाले
मिलिंद नार्वेकर यांचं ट्वीट काय होतं?
Frustration! मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे! असं मिलिंद नार्वेकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
भास्कर जाधव यांचा तो व्हिडिओ काय?
मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला होता. एका वृत्तवाहिनीची महिला पत्रकार भास्कर जाधव यांना प्रश्न विचारत असताना मागून गाडीचा हॉर्न वाजत होता. त्यावेळी जाधव वैतागून त्या दिशेने पाहतात. तेव्हा तिने ‘मिलिंद नार्वेकर’ आहेत, असं जाधवांना सांगितलं. त्यावर ‘नार्वेकर कोण लागून गेला?’ असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला होता. त्यांच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
