Nanded Son Killed Mother : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
प्रतिक चौथरे हा तरोडा भागातील राहुलनगरमध्ये आपल्या आईसोबत राहत होता. त्याचे वडील बालाजी चौथरे हे सीआरपीएफमध्ये कार्यरत असून चेन्नई येथे कार्यरत आहेत. तर बहीण ही पुणे येथे शिक्षण घेत आहे. काल शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रतिकचा त्याच्या आईसोबत वाद झाल्याची माहिती आहे. याच वादातून त्याने आईला मारहाण करत डोक्यात रॉड घातला. रक्तबंभाळ झालेल्या भारती चौथरे या आईचा जागेवर मृत्यू झाला.
Pune Crime: आई गावी गेलीय; आधी माऊलीला संपवलं, नंतर बॉडी तशीच ठेवून घराला कुलूप ठोकलं; अखेर फुटलं पुण्यातील घटनेचं बिंग!
घटनेनंतर आरोपी मुलगा खोलीतील मयत आईच्या फोटोला अर्धातास स्क्रूड्राईव्हर मारत राहिला. घरातून महिलेचा आवाज आल्यानं नागरिक जमा झाले. घराबाहेर लोक जमा झाल्यानं तो घाबरला आणि दुसऱ्या खोलीत जाऊन त्यानेही गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा मुख्य दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला, यावेळी भारती चौथले ह्या रक्तबंभाळ अवस्थेत आढळून आल्या तर प्रतिकचा मृतदेह हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मागील काही दिवसापासून तो मानसिक तणावात होता आणि नांदेड शहरातील एका डॉक्टरकडे त्याचे उपचार सुरु होते अशी माहिती समोर आली आहे.
रेल्वेत नोकरीही लागलेली
दरम्यान, प्रतिक हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. अनेक मेडल त्याच्या खोलीत आढळून आले. काही महिन्यांपूर्वी तो रेल्वेची प्रतीक्षा उत्तीर्ण झाला होता. जॉइनिंग लेटर देखील आल्याची माहिती आहे. मात्र, जन्मदात्या आईची निर्घृणपणे हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याची माहिती भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली. आईचा जीव घेण्यामागचं नेमकं कारण काय? मुलानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं? या घटनेमागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत.
Pune Crime : जन्मताच चिमुकलीच्या नशिबी मरण! खराडीच्या नदीपात्रात नवजात मुलीची बॉडी, पुण्यातील घटनेचं गूढ वाढलं
24 तासांत हत्येच्या तीन घटना
नांदेडमध्ये काल शनिवारी हत्येच्या तीन घटना घडल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पहिली घटना बाफना परिसरात घडली. कचरा वेचणाऱ्यांमध्ये वाद होऊन एकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर दुपारी 4 वाजेच्या सुमारास टोळीतील चार ते पाच जणांनी दुचाकीवर जात असलेल्या 26 वर्षीय इंदरसिंघ बावरी या तरुणाची चाकू भोसकून हत्या केली. शहरालगत असलेल्या वाजवा पेट्रोल पंप वाजेगाव रोड पेट्रोल पंपावर ही घटना घडली. जुन्या वादातून हत्याकांड झाल्याची चर्चा आहे. आरोपी हे केबी गँगचे होते. तिसरी घटना राहूलनगरमध्ये घडली. मुलानेच आईची हत्या करून स्वतः आत्महत्या केली.
