• Fri. Jun 26th, 2026
    विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतमोजणी; कोण मारणार बाजी?


    Maharashtra MLC Election 2026 Result Live Updates: विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १८ जून रोजी मतदान झालं असून सोमवारी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. यंदा राज्यात एकूण १७ जागांवर विधान परिषदेसाठी निवडणूक होणार होती. पण यापैकी ६ जागा बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित ११ जागांसाठी मतदान झालं. सध्या महायुतीचं पारडं जड दिसत असलं तरी उरलेल्या ११ जागांवर निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग,पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगरमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सोमावरी, सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed