Vidhan Parishad Election Result: विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल आज लागणार आहे. कुठल्या जागांची होणार मतमोजणी? कोण मारणार बाजी?
या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली होती, मात्र महायुतीचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. तसेच, मतफुटी होऊन महाविकास आघाडीतील पक्षांना खिंडार पडले आहे का, हेही पहावे लागणार आहे.
Maharashtra Monsoon Session 2026: विरोधकांची कसोटी! आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन; कोणते मुद्दे गाजण्याची शक्यता?
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी होत असलेली ही निवडणूक गाजली ती महाविकास आघाडीतील उमेदवारांनी ऐनवेळी घेतलेल्या माघारीमुळे. या माघारीमुळे सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित जागांवरही महायुतीच्याच उमेदवारांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.
पसंतीक्रमानुसार होणाऱ्या या निवडणुकीमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीचा अधिकृत उमेदवार रोडल्यास इतर कुठल्याही उमेदवाराला मतदान करू नये, अशा आशयाचा व्हिप बजावण्यात आला होता. तसेच, या व्हिपविरोधात जाऊन कुणी मतदान केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर या जागांवर महायुती-महाविकास आघाडी यामधील कुणाची सरशी होते हे पहावे लागणार आहे.
कुठल्या जागांची मतमोजणी ?
सोलापूर, जळगाव, सांगली – सातारा, नांदेड, नागपूर (पोटनिवडणूक), भंडारा -गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी – हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना
Best Employees : बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! हंगामी पगारवाढ मंजूर अन् ग्रॅच्युइटीची घोषणा
विजयाचा गुलाल ‘पहिल्या पसंती’वरच?
विधान परिषदेच्या अमरावती आणि भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा फैसला आज, सोमवारी होणार आहे. सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. चार टेबलांवर होणाऱ्या या प्रक्रियेसाठी चोख प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहिल्या पसंतीच्या मतांवरच निकाल लागल्यास अवघ्या दोन तासांत; दुपारी १२ वाजतापर्यंत अमरावतीचा नवा आमदार निश्चित होईल. निवडणूक रिंगणात भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा या हे तीन उमेदवार आहेत. महायुतीचे संख्याबळ पाहता भाजपचे पोटे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
