Supriya Sule Daughter Revati Sule Wedding : रेवती सुळेंच्या संगीत समारंभातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांनी अभिनेता शाहरुख खानला आलिंगन दिल्याचेही एका व्हिडिओत दिसते.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे विवाहबंधनात अडकत आहे. भाजपचे विधान परिषद उमेदवार आणि व्यावसायिक अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंगसोबत त्या आज, शनिवार २० जून रोजी बोहल्यावर चढत आहेत. त्याआधी, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने रेवती सुळेंच्या लग्नापूर्वी आयोजित संगीत सोहळ्याला हजेरी लावली. या समारंभातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रेवती यांनी शाहरुखला आलिंगन दिल्याचेही एका व्हिडिओत दिसते.
शाहरुखचा धमाकेदार डान्स
शाहरुख खान १९९८ मधील ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील ‘कोई मिल गया’ या गाण्यावर रेवती आणि इतरांसोबत डान्स करताना एका व्हायरल क्लिपमध्ये दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये शाहरुख त्याची प्रसिद्ध आयकॉनिक पोझ देताना दिसत आहे. रेवतीने शाहरुखला आलिंगन दिल्याचेही पाहायला मिळाले. Crime News : आधी बायकोशी वाद, मग 15 वर्षांपासून घरकाम करणाऱ्या महिलेचा डॉक्टरने जीव घेतला, पोलीस येताच तीनच शब्द म्हणाला मुंबईत आयोजित संगीत समारंभासाठी शाहरुखने पारंपरिक भारतीय वेशभूषेचा आधुनिक अवतार निवडला. त्याने पूर्ण काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. आधुनिक ‘बंदगळा’ किंवा ‘शेरवानी-स्टाईल ब्लेझर’शी साधर्म्य दर्शवणारे जॅकेट शाहरुखने घातले होते.
नागपूरच्या सूनबाई होणार
सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी हे नागपुरातील विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. विधान परिषदेच्या चंद्रपूर वर्धा गडचिरोली मतदारसंघासाठी ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उमेदवार आहेत. त्यांची बिनविरोध निवड निश्चित असून आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे. रेवती सुळे नागपूरची सून होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याची माहिती आहे.
Pune News | पुणे पोलिसांचा प्रताप, विकास लवांडेंचे गंभीर आरोप
Pune Crime : होणाऱ्या बायकोच्या बर्थडेचं सेलिब्रेशन , सोबत दोन जवळचे मित्र, लोहगडावर केतनच्या मृत्यूआधी काय घडलं? घटनाक्रम समोर शरद पवार यांची नात असलेल्या रेवती सुळे राजकारणात सक्रिय नाहीत, परंतु २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा लढत झाली, त्यावेळी रेवती सुळे बारामती मतदारसंघात प्रचार दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या. रेवती सुळे यांनी मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा