CBI Court Verdict: हा खटला प्रामुख्याने आरोपी पारसमल जैन याच्या कबुलीजबाबांवर आधारित होता. मात्र, त्याचे दोन्ही कबुलीजबाब विसंगतींनी भरलेले असल्याने सीबीआयचा संपूर्ण खटलाच कोसळला.
एक मणी विस्कटल्यानंतर संपूर्ण माळच विस्कटली! पवनराजे निंबाकरवी प्रकरणातील कशामुळे निर्दोष सुटले? वाचा CBI कोर्टाचा निकाल जशाचा तसा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रमेश खोकराळे, मुंबई : ‘काँग्रेसच्या एका बड्या नेत्याची हत्या होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने कट रचला आणि नंतर त्याची गोळ्या झाडून हत्या घडवून आणली’, अशा आरोपांमुळे राज्यभर गेली दोन दशके चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या खटल्याचा निकाल अखेर शनिवारी आला. ‘सरकारी पक्षाने गुन्हा सिद्ध होण्यासाठी आवश्यक व सबळ पुरावेच दिलेले नाहीत. माफीचा साक्षीदार बनलेल्या आरोपीचे कबुलीजबाब दबावाखाली घेतल्याचे आणि ते विसंगतींनी भरलेले असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या आरोपींनी कट रचून हत्या घडवली, हे सिद्धच होत नाही. परिणामी संशयाचा फायदा देऊन सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात येत आहे’, असा निकाल विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी दिला.
निकाल सुनावणीच्या वेळी गर्दीने खच्चून भरलेल्या कोर्टात आरोपी पद्मसिंह पाटील हे व्हीलचेअरवर उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र व भाजपचे धाराशिवमधील आमदार राणाजगजितसिंह पाटील हे देखील उपस्थित होते. तसेच दिवंगत काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आणि सध्या पक्षफुटीमुळे चर्चेत असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हेही कोर्टात उपस्थित होते.
पवनराजे व त्यांचे चालक समद काझी यांची स्कोडा कार ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे एक्स्प्रेस वेजवळ एका इंडिका कारने ओव्हरटेक करत अचानक थांबवली आणि त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांनी राजकीय व व्यावसायिक वैरातून त्यांचे चुलत बंधू असलेले पवनराजे यांच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर दोन हल्लेखोरांना सुपारी देऊन हत्या घडवून आणली’, असा आरोप सीबीआयने ठेवला होता. याप्रकरणी पाटील यांच्यासह आठ आरोपींविरोधात हा खटला चालला. मात्र, सर्व आरोपी निर्दोष ठरल्याने एका मोठ्या राजकीय नेत्याच्या हत्येच्या प्रकरणात आधी तपास करणाऱ्या नवी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि नंतर तपास करणाऱ्या सीबीआय या दोन्ही यंत्रणांना मोठा झटका बसला आहे.
‘पारसमलने आपल्याला या प्रकरणात गोवले असल्याचे आधी सातत्याने म्हटले होते. पोलिसांनी धमकावले, छळ केला, चकमकीत मारण्याची धमकी दिली, कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे आरोप त्याने अटकेनंतर केले होते. त्याने तेव्हा कोर्टात काही अर्जही केले होते. खटल्यातील अन्य आरोपींना जामीन मिळाला असताना आपल्यालाही मिळावा, अशी याचना तो वारंवार करत होता. तरीही जामीन मिळाला नसल्याने त्याच्या मनात ईर्षा निर्माण झाल्याचे त्याचे तेव्हाचे अर्ज पाहता दिसून येते. अशा पार्श्वभूमीवर, नंतर त्याने कथित दोन कबुलीजबाब दिले. त्यामुळे दोन्ही कबुलीजबाबांवर संशयाचे ढग निर्माण होतात. शिवाय नंतर खटल्यातील साक्षी, पारसमलचे दोन्ही कबुलीजबाब आणि न्यायालयातील साक्ष हे सर्व तपासल्यानंतर गुन्ह्याबद्दलचे त्याचे कबुलीजबाब विश्वासार्ह नसल्याचे पूर्णपणे स्पष्ट होते. कबुलीजबाब आणि कोर्टातील त्याची साक्ष लक्षात घेता, आरोपींनी कट रचून पवनराजे यांची हत्या केली, हे सरकारी पक्षाला सिद्ध करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे संशयाचा फायदा देऊन सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात येत आहे’, असे न्यायाधीश नवंदर यांनी स्पष्ट केले.
‘कोर्टासमोर जे पुरावे आले आहेत, त्यावरून आरोपींना दोषी ठरवून शिक्षा देता येत नाही. कारण गुन्ह्याबाबतची घटनाक्रमांची साखळीच पूर्ण होत नाही. सरकारी पक्षाने माफीच्या साक्षीदाराचा एक धागा पकडला. पण एक मणी विस्कटल्यानंतर संपूर्ण माळ जशी विस्कटते, तसे या प्रकरणात झाले आहे. सरकारी पक्षाने आरोपींचे मोबाईल जप्त केले नाही, कॉल डेटा रेकॉर्डचे पुरावे न्यायालयात दिले नाही. त्याशिवाय अनेक महत्त्वाच्या बाबींवरही पुरावे सादर केले नाहीत’, असे विवेचनही न्यायाधीशांनी निकाल सुनावणीच्या वेळी केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा