• Wed. Aug 5th, 2026

    Aditya Thackeray: ओमराजेंकडून बंडानंतर गंभीर आरोप; आदित्य ठाकरेंकडून आता जोरदार पलटवार; खासदारांच्या पक्षांतराचं कारण सांगितलं!

    Aditya Thackeray: ओमराजेंकडून बंडानंतर गंभीर आरोप; आदित्य ठाकरेंकडून आता जोरदार पलटवार; खासदारांच्या पक्षांतराचं कारण सांगितलं!

    Shivsena Split News: “महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही. या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल,” असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

    ओमराजेंकडून बंडानंतर गंभीर आरोप; आदित्य ठाकरेंकडून आता जोरदार पलटवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पडलेल्या दुसऱ्या फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील लोकसभेच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून लवकरच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नावावर आणि मशाल या नव्या चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांनी अवघ्या दोन वर्षांत पक्षाला रामराम का ठोकला, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असतानाच बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीतून ओमराजे निंबाळकर यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवले आहेत. या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला असून “कितीही कारणे द्या, पण सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे,” असा हल्लाबोल बंडखोर खासदारांवर केला आहे.

    बंडखोरीचं कारण देताना ओमराजे निंबाळकर यांनी मांडलेल्या मुद्द्यांची आज सकाळपासून चर्चा सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये आदित्य यांनी म्हटलंय की, “आज आपला ६० वा वर्धापन दिन. मात्र पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत. तुम्ही कितीही कारणे द्या, पण सत्य एकच आहे आणि ते म्हणजे तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, मात्र त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव व तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावलं आहे,” अशा शब्दांत त्यांनी बंडखोर खासदारांचा समाचार घेतला आहे.

    ओमराजे निंबाळकरांनी आदित्य ठाकरेंवर काय टीका केली?

    शिवसेनेतील दुसऱ्या बंडानंतर सर्वाधिक चर्चा होत आहे ती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची. कारण ठाकरेंचे निष्ठावंत अशी प्रतिमा ओमराजे यांच्याकडून सातत्याने निर्माण करण्यात आली होती. त्यामुळे ते ठाकरेसमर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होते. अशातच तेदेखील बंडखोर खासदारांच्या गटात सामील झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठा आगडोंब उसळला आणि ओमराजेंना ट्रोल केलं जाऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांनी मुलाखतीतून आपली बाजू मांडली. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. “एकीकडे विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत की विधानपरिषद निवडणुका…यानिमित्ताने राज्यभर फिरत आहेत, आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देत आहेत. मात्र दुसरीकडे, प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे यांना फिरता येत नसलं तरी किमान आदित्य ठाकरे यांनी तरी राज्यभरात फिरून कार्यकर्त्यांना ताकद द्यायला हवी होती,” अशी खदखद ओमराजेंनी व्यक्त केली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा