• Sun. Jun 21st, 2026

    दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ठाण्यात धावली ‘डबलडेकर बस’, लवकरच दुसरी बसही येणार; कोणत्या मार्गावर सेवा सुरू?

    दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ठाण्यात धावली ‘डबलडेकर बस’, लवकरच दुसरी बसही येणार; कोणत्या मार्गावर सेवा सुरू?

    Double Decker E-Bus: ठाण्यात पहिली डबलडेकर बससेवा सुरू झाली. टीएमटीच्या ताफ्यात दहा डबल डेकर ई-बस दाखल होणार असून ठाण्यातील बस प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, ठाणे: ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबलडेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मागील वर्षी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी करण्यात आले होते. मात्र तब्बल दीड महिना ही बस घोडबंदर रोड येथे आनंदनगर आगारात धूळखात पडली होती. अखेर ही डबलडेकर वातानुकूलित बस ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या पर्यावरणपूरक प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

    चार्जिंगची पर्यायी व्यवस्था

    डबलडेकर बसच्या स्वतंत्र चार्जिंग स्टेशनच्या अभावामुळे ही बस सेवेत दाखल होण्यास अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दोन आठवड्यांपूर्वी ठाणे परिवहन सेवेच्या वागळे आगाराला भेट दिली. यावेळी येथील उपलब्ध जागेची पाहणी करून चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्यासाठी तसेच चार्जिंग स्टेशन पूर्णत्वास येईपर्यंत पर्यायी चार्जिंग व्यवस्था उपलब्ध करून बस लवकरात लवकर प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्याबाबत चर्चाही केली होती. अखेर महापौरांच्या निर्देशांनंतर परिवहन प्रशासनाने चार्जिंगची पर्यायी व्यवस्था उभी केली. त्यामुळे अखेर १५ जूनपासून ही बस नियमित सेवेत दाखल झाली.

    Maharashtra TimesBest Bus Strike: मुंबईकरांचे हाल, बेस्ट कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; काय आहेत प्रमुख मागण्या?

    या मार्गावर डबलडेकर धावली

    सध्या ही बस २२ नंबर सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर प्रवाशांच्या सेवेत धावत आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत बसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच आणखी एक वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल होणार असून पहिल्या टप्प्यात दोन डबलडेकर बस शहरात धावणार आहेत. तसेच आगामी काळात दहा बस सेवेत दाखल होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

    Maharashtra TimesPune-Bengaluru Highway: पुणे-बंगळुरू महामार्गावर कोंडी फुटणार, कराड पुलाचं काम अंतिम टप्प्यात; कुठून-कुठे मार्ग?

    बेस्टच्या ताफ्यात यापूर्वीच डबलडेकर बसेस आहेत. टीएमटीसाठी पहिल्यांदाच डबल डेकर बस घेण्यात आली. दुसरी डबल डेकर बससुद्धा लवकरच टीएमटीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या मार्गांवर सर्व बस सेवा सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. लवकरात-लवकर या बस सुरू झाल्या तर ठाणेकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या चार्जिंगची पर्यायी व्यवस्था सुरू करून बससेवा सुरू करण्यात आली आहे. पण सर्व बस दाखल झाल्यानंतर स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारणं आवश्यक असेल. त्यामुळे चार्जिंग स्टेशनसाठी सध्या हालचाली सुरू आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा