• Wed. Aug 5th, 2026
    Uddhav Thackeray: ओमराजे…प्रेम बघितलं, आता रोष बघा! सोडून गेलेल्यांना दणका देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन ठरला

    Shivsena Split: सोडून गेलेल्यांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नव्याने रणनीती आखली असून उद्या मातोश्री निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

    सोडून गेलेल्यांना दणका देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन ठरला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत २०२२ नंतर पुन्हा एकदा मोठी फूट पडली असून पक्षाचे लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार फुटणार, हे आता स्पष्ट झालं आहे. शिवसेनेतील पहिल्या फुटीनंतर जवळपास ४० आमदार आणि लोकसभेतील बहुतांश खासदार ठाकरेंपासून वेगळे झाले होते. मात्र त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी संघटना नव्याने बांधत उरलेल्या सहकाऱ्यांसह निकराची झुंज दिली आणि २०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नव्या पक्षाच्या नावासह आणि नव्या चिन्हासह पुन्हा नऊ खासदार निवडून आणले. मात्र पक्षात आता दुसऱ्यांदा फूट पडल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. स्वत:ला ‘मातोश्री’चे निष्ठावंत मावळे म्हणवून घेणारे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासारखे शिलेदारही ठाकरेंपासून दुरावले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, ज्या खासदारांनी मशालीची साथ सोडली आहे त्या खासदारांच्या मतदारसंघात असणारे पक्षाचे आमदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी यांना उद्धव ठाकरे यांनी उद्या मातोश्री निवासस्थानी बैठकीसाठी बोलावले आहे. यामध्ये धाराशिव, परभणी, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ आणि मुंबईतील आमदार आणि जिल्हाप्रमुखांचा समावेश आहे. खासदारांसोबत महत्त्वाचे पदाधिकारी पक्ष सोडून जाऊ नयेत, यासाठी आता उद्धव ठाकरे प्रयत्नशील असल्याचं दिसत आहेत.

    ज्यांना जिंकवण्यासाठी जीवाचं रान केलं, त्यांच्या पराभवासाठी कंबर कसणार!

    २०२४ ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत लढवली होती. लोकसभा निवडणुकीच्या दोन वर्ष आधी पक्षातील आमदार, खासदारांसह अनेक बड्या चेहऱ्यांनी साथ सोडली होती. अशा स्थितीत उरलेल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसह निवडणुकीला सामोरे गेले. पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना सोडू नका, अशी साद ठाकरे यांनी शिवसैनिकांना घातली. नव्या शिलेदारांच्या विजयासाठी ठाकरेंनी जंगजंग पछाडले आणि विपरीत स्थितीतही नऊ खासदार निवडून आणले. फुटीनंतर ज्या सहकाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांनी मोठा विश्वास टाकला होता, त्यातील सहा खासदारांनी पुन्हा एकदा ठाकरेंना सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा विश्वासघात करणाऱ्या नेत्यांना आगामी निवडणुकीत पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आतापासूनच दंड थोपटण्याचे निश्चित केल्याचं दिसत असूनन उद्या मातोश्रीवर होणाऱ्या पहिल्याच बैठकीत याबाबतची दिशा ठरण्याची शक्यता आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा