Mumbai News: १८ जूनपर्यंत ठोस आश्वासन न मिळाल्यास सर्व कर्मचारी संघटना संयुक्तपणे तीव्र आंदोलन करतील आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार, मुंबई महापालिका व बेस्ट प्रशासनाची असेल, असा इशारा बेस्ट संयुक्त कृती समितीने दिला होता.
best bus(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १२ संघटनांचा समावेश असलेल्या बेस्ट संयुक्त कृती समितीने आज, शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे परिवहन सेवेवर परिणाम झाला असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवृत्त कामगारांची देणी एकरकमी द्या, बेस्ट उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करा, बेस्टच्या मालकीच्या बसची संख्या वाढवा, बेस्टमधील १० हजार रिक्त पदे तातडीने भरा, परिवहन आणि विद्युत विभागातील कंत्राटीकरण रद्द करून भाडेतत्त्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या, आदी मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
औद्योगिक न्यायालयाने कर्मचारी कामगारांना संपावर न जाण्याचे आदेश दिले असतानाही कृती समिती संपावर ठाम आहे. बेमुदत संप झाल्यास बेस्ट उपक्रमाच्या परिवहन आणि विद्युत विभागातील कर्मचारी यात सहभागी होतील.
बेस्ट परिवहन आणि विद्युत सेवांमध्ये कंत्राटी कामकाजावरील वाढत्या अवलंबित्वामुळे बेस्टची स्थिती कमकुवत झाली असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. सध्या बेस्टच्या मालकीच्या केवळ २४१ बस आहेत, तर कंत्राटी तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या बसची संख्या सुमारे दोन हजार असल्याचे सांगण्यात येते. मुंबईच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी किमान पाच हजार अतिरिक्त बसची आवश्यकता असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्याचे आवाहन करत समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुंबईच्या महापौर आणि बेस्ट प्रशासनाला पत्र लिहिले होते.
उपक्रमाने यावर निर्णयच न घेतल्याने अखेर गुरुवारी सायंकाळनंतर झालेल्या बैठकीत कृती समितीने संप पुकारण्याचा निर्णय घेतला. यामध्ये परिवहन आणि विद्युत विभागातील ३८ हजार कर्मचारी, कामगार सहभागी होणार असल्याचा दावा बेस्ट कर्मचारी सेनेचे सरचिटणीस उदय आंबोणकर यांनी केला. यात भाडेतत्त्वारील बस गाड्यांवरील चालक, यांत्रिकी कर्मचाऱ्यांचाही सहभाग असणार आहे. औद्योगिक न्यायालयाची प्रत उशिरा मिळाली. मात्र, आम्ही संपावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बेस्ट प्रशासनाने आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. त्यांनी थेट न्यायालयाकडून संपाच्या मनाईचे आदेश आणले. त्यामुळे हे मान्य नाही. त्यामुळे कमर्चारी संपावर ठाम असल्याचे बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी सांगितले. मात्र, मोठी संघटना असलेल्या बेस्ट वर्कर्स युनियनसह अन्य एका युनियनने संपाला पाठिंबा दिलेला नाही.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा