• Fri. Aug 7th, 2026

    Amey Ghole : पुन्हा करेक्ट कार्यक्रम! ठाकरेंचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात; महापालिका गटनेते अमेय घोलेंचा मोठा दावा

    Amey Ghole : पुन्हा करेक्ट कार्यक्रम! ठाकरेंचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात; महापालिका गटनेते अमेय घोलेंचा मोठा दावा

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात कमी निधी मिळाल्याने शिवसेना उबाठा पक्षात खदखद असून, विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता असल्याने यावरून नाराजीनाट्य उफाळून येण्याची शक्यता आहे. उबाठा पक्षाचे खासदार फुटल्यानंतर, आता मुंबई महापालिकेतील २० ते २५ नगरसेवकही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी केला आहे; तर ऑपरेशन टायगर हे ‘ऑपरेशन लोटस’शिवाय अशक्य असल्याचे महापालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर यांनी केला आहे.

    ठाकरे यांच्या गटात सध्या लोकप्रतिनिधींची गळचेपी होत आहे. पक्षातील खासदार आणि आमदारांना नेतृत्वाकडून भेटीसाठी पुरेसा वेळ आणि महत्त्व दिले जात नाही. याच कारणास्तव लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी असून पक्षांतर्गत अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे, असा दावा घोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

    Uday Samant: …तर राजीनामा देईन! गुणरत्न सदावर्तेंच्या आरोपावर उदय सामंत यांचा पलटवार, नेमकं काय म्हणाले?
    नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातून शिवसेना उबाठा पक्षाच्या अनेक नगरसेवकांना प्रत्येकी केवळ २५ लाख रुपये निधी मिळाला. तर सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष आणि विविध समिती अध्यक्षांच्या वाट्याला कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे आपल्या प्रभागात विकासकामे करणार कशी, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे, असा दावा घोले यांनी केला.

    ‘ संख्या ४५पर्यंत जाणार ‘
    येत्या महापालिका अर्थसंकल्पाच्या आधी काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील. २० ते २५ नगरसेवक संपर्कात असून ही संख्या कालांतराने ४५ पर्यंतही जाईल, असा दावा अमेय घोले यांनी केला आहे.

    Maharashtra TimesAyodhya Poul Patil : नागेशमामा, सोबत कोण आहेत सांगू का? ठाकरेसेनेने बंडखोर खासदारांना डिवचलं, तुमच्या ‘वर्मा’त हात घातल्यासारखे होईल!
    ‘राज्यात आता ऑपरेशन तुडवा’- राऊत
    बंडखोर खासदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आणि त्यांच्या बंडखोरीवर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आता गद्दारांविरोधात ऑपरेशन तुडवा राज्यात ठिकठिकाणी सुरू होईल, असा जाहीर इशारा त्यांनी गुरुवारी दिल्लीत दिला. या लोकांना आम्ही सोडणार नाही व यांची गद्दारी जनतेसमोर मांडण्यासाठी आपण सभा घेऊ, असे शरद पवार यांनी आपल्याला सांगितले आहे, असेही राऊत म्हणाले. बंडखोर खासदार हे टायगर नव्हेत, तर भ्याड व पैशाने विकत घेतले गेलेले गद्दार आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. ‘तुम्ही आमच्या जिवावर, आमच्या पक्षावर आणि चिन्हावर निवडून आले आहात. जर तुमच्यात हिंमत असेल, तर तत्काळ राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा. यंदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि याच वर्षी या गद्दारांनी हे कृत्य केले आहे, असेही ते म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed