• Fri. Aug 7th, 2026
    नागेशमामा, सोबत कोण आहेत सांगू का? ठाकरेसेनेने बंडखोर खासदारांना डिवचलं, तुमच्या ‘वर्मा’त हात घातल्यासारखे होईल!

    Maharashtra Politics : ​”नागेश मामा कोणाच्या घरी किती खोक्यात डील झाली हे महाराष्ट्राला सांगितले तर तुमच्या “वर्मा”त हात घातल्यासारखे होईल का?” असा बोचरा सवाल ठाकरे गटाच्या समर्थक अयोध्या पौळ पाटील यांनी विचारला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बंडखोरीच्या मुद्द्यावर गुरुवारी दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीकडे नऊपैकी सहा खासदारांनी पाठ फिरवली. या सहा जणांनी पक्षनेतृत्वाचा आदेश धुडकावल्याने ठाकरेसेनेच्या संसदीय पक्षातील फूट जवळपास निश्चित मानली जात आहे. यानंतर दोन्ही शिवसेना पक्षांमध्ये सोशल मीडियावर वाक्-युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या समर्थक आणि सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य समन्वयक अयोध्या पौळ पाटील यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून ठाकरेंची साथ सोडणारे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर शरसंधान साधले आहे.

    अयोध्या पोळ काय म्हणाल्या?

    “नागेश मामा कोणाच्या घरी किती खोक्यात डील झाली हे महाराष्ट्राला सांगितले तर तुमच्या “वर्मा”त हात घातल्यासारखे होईल का? आणि होss सोबतचे कोण आहेत ते महाराष्ट्राला सांगु का?? गृहमंत्री देवाभाऊ तुमच्या गुप्तहेर खात्यास माझी काही मदत लागती तर नक्की कळवा..” अशी पोस्ट करत अयोध्या पौळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, ठाकरेंचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांना टॅग केलं आहे.

    आष्टीकर यांच्या पुत्राची प्रतिक्रिया

    नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार होते. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आष्टीकर पितापुत्रावर गंभीर आरोप केल्यानंतर, कृष्णा यांनी त्याला उत्तर दिलं आहे. “मतदान अंतिम टप्प्यात असताना सुषमा अंधारे यांनी लिहिलं की मला मतदान करू नये, मला मतदान करू नये म्हणजे कोणाला करा? सुषमा अंधारे नेहमी असंच काहीतरी बोलतात. म्हणूनच हे लोक असेच काही नाराज झाले असावेत, माझं उद्धव साहेब आणि मिलिंद नार्वेकर साहेबांसोबत देखील बोलणं झालेलं आहे. काँग्रेसने अधिकृत व्हीप बजावून मला मतदान करायला सांगितलं आहे. माझी मी भूमिका स्पष्ट केली आहे. मी आघाडीसोबत आहे, होतो आणि राहणार पण आहे. सुषमा अंधारेंना काय गडबड होती किंवा माझ्याबद्दल काय आकस होता देव जाणे, त्यांनी बोलायला पाहिजे होतं खासदार साहेबांबद्दल, परंतु माझ्याबद्दल बोलायला काही कारण नव्हतं. गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात आहेत आणि अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटात आहे. ते स्वीकार्य होऊ शकतं, तर कृष्णा पाटील आष्टीकर का होऊ शकत नाही?” असा सवाल त्यांनी विचारला.
    Maharashtra TimesPune News : लग्नासाठी 14 कोटींचा महाल बूक, पण त्याआधीच आक्रित; होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर ट्रेकिंग, पुण्यातील तरुणाचा वेदनादायी शेवट

    ठाकरेंच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला सहा जण गैरहजर

    दरम्यान, संविधान सदनाच्या तिसऱ्या मजल्यावरील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या दालनात झालेल्या बैठकीला लोकसभाध्यक्षांना पत्र देणारे अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे, तसेच संजय राऊत हे चौघेच उपस्थित होते. बंडखोरांमधील नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

    ‘या बंडखोरांना पक्षाशी गद्दारी करणे महागात पडेल. त्यांना मतदारसंघात फिरणे कठीण होईल’, असा इशारा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिला. त्याचबरोबर ‘संजय दिना पाटील व ओमराजे हे दोघेही शिवसेनेसोबत नाहीत’, असा दावा त्यांनी केला.

    Ayodhya Poul Patil

    ठाकरेसेनेचा इशारा

    ‘या खासदारांची अनुपस्थिती ही पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन मानली जाईल आणि त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यासाठी कायदेशीर कारवाईचा विचार करू’, असे सांगत राऊत यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगालाही जबाबदार धरले. ‘शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर गेली साडेतीन वर्षे निकाल न देणारे सर्वोच्च न्यायालय सध्या सुरू असलेल्या पक्षफोडीच्या प्रकारांचे पहिले अपराधी आहे’, असा आरोप त्यांनी पुन्हा केला.

    हिंमत असेल तर आडवे या, संजय राऊतांवर बोचरी टीका; शिंदेंच्या खासदाराचा ठाकरेसेनेवर हल्लाबोल

    लोकसभेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे नऊ सदस्य आहेत आणि पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्रता टाळण्यासाठी, किमान सहा जणांना एकाच वेळी पक्ष बदलावा लागेल. पक्षाच्या सहा बंडखोर खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीनीकरणाची मागणी करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करून ते बिर्ला यांना सादर केले, तरी याबाबतची संसदीय प्रक्रिया क्लिष्ट असल्याने ती अद्याप पूर्ण झालेली नाही. अशा प्रकरणी पडताळणीसाठी लोकसभाध्यक्षांच्या कार्यालयाला काही खासदारांच्या वैयक्तिक उपस्थितीची आवश्यकता आहे, असे सांगितले जात आहे.
    Maharashtra TimesUddhav Thackeray : ठाकरेंना पुन्हा झटका, BMC नगरसेवकांची संख्या घटली, किशोरी पेडणेकरांकडून सभागृहात विरोध, 6 महिन्यांच्या मुदतीची आठवण
    ही प्रक्रिया योगदिनाच्या (२१ जून) नंतरच्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे समजते. संसदीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सध्या बंडखोर खासदारांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र ‘बंडखोरांनी असे पत्र दिले असेल, तर त्यांना बंडखोरीस भाग पाडणाऱ्यांनी ते सार्वजनिक करावे’, असे आव्हान अरविंद सावंत यांनी दिले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा