• Thu. Jun 18th, 2026

    Bhaskar Jadhav: उद्धव ठाकरेंना पक्षफुटीचा दुसरा मोठा धक्का, भास्कर जाधवांकडून मोलाचा सल्ला; नवसंजीवनीचा फॉर्म्युलाही सांगितला!

    Bhaskar Jadhav: उद्धव ठाकरेंना पक्षफुटीचा दुसरा मोठा धक्का, भास्कर जाधवांकडून मोलाचा सल्ला; नवसंजीवनीचा फॉर्म्युलाही सांगितला!

    प्रसाद रानडे, रत्नागिरी: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार फुटणार, हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी ‘डरो मत’ म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी एवढेच सांगेन की, डरो मत, बिलकुल डरो मत.. जो होनेवाला वो होनेही वाला है… चिंता मत करो,” अशा स्वरूपाचा सल्ला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यावेळी जाधव यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

    “हे दिवसही निघून जातील. ते घालवण्यासाठी आपल्याला आता काहीतरी कार्यक्रम राबवावा लागेल, काही निर्णय घ्यावे लागतील, काही भूमिका आपल्याला ठरवाव्या लागतील,” असं म्हणत भास्कर जाधव यांनी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी संघटनेत काही बदल करण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंना केलं आहे.

    भास्कर जाधव म्हणाले की, “गेली दीड-पावणे दोन वर्ष सातत्याने उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटणार, अशा वावड्या उठवल्या जात होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार वेगळा गट स्थापन करणार, ते अन्य कोणत्या पक्षात जाणार, अशा प्रकारची सातत्याने अफवांची राळ उठवण्याचे काम सुरू होते. आज केंद्रामध्ये व राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. इतके तुम्ही सत्ताधीश असताना शेवटी समाजामध्ये काही विश्वासार्हता नावाची गोष्ट असते, ती तुमची कितपत शिल्लक राहते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज हा पक्ष फोडणार, उद्या तो पक्ष फोडणार, शेवटी दुसऱ्या पक्षाकडून लोक घेऊन तुमच्या पक्षाची सूज जरी वाढत असली तरी समाजामध्ये तुमची असलेली प्रतिष्ठा, तुमचा असलेला आदर हा दिवसागणिक रसातळाला जात आहे. ही लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये कधी काय घडेल हे सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे ज्या पक्षांबद्दल हे बोलले जाते त्यांनी थोडी जनाची नाही मनाची तरी बाळगावी,” असा शब्दांत भास्कर जाधव यांनी भाजपवर आगपाखड केली आहे.

    दरम्यान, “या देशामध्ये 70 वर्ष काँग्रेसने काय केलं म्हणून प्रश्न विचारणारे लोक यांच्या पक्षाला काँग्रेसने असं तोडण्या-फोडण्याचं काम नाही केलं. काँग्रेसमध्ये पक्षांतर झाली नाही का? तर झाली पक्षांतरे. पण हे होत असताना छोटे-मोठे पक्ष संपवूनच टाकायचेत, आम्हाला आणि फक्त आम्हालाच या देशामध्ये राहायचंय, अशा एका दुष्ट हेतूने काँग्रेसने कुठलाही पक्ष संपवण्याचं काम केलं नाही,” असंही भास्कर जाधव म्हणाले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed