Paneer Analogue Ban: राज्यातील अनेक ठिकाणी पनीरऐवजी ‘पनीर ॲनालॉग’ची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.
एफडीएकडून १ एप्रिल, २०२५ ते ३१ मार्च, २०२६ या कालावधीत तपासलेल्या ३०८ पनीरच्या नमुन्यांपैकी १०९ नमुने (३५.४ टक्के) निकृष्ट किंवा असुरक्षित असल्याचे आढळून आले. त्यापैकी ७९ नमुने निकृष्ट, तर ३० नमुने असुरक्षित असल्याचे प्रयोगशाळा अहवालात नमूद करण्यात आले आहे. अनेक नमुन्यांमध्ये दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पतीजन्य चरबीचा वापर झाल्याचेही निदर्शनास आले होते.
Eknath Shinde: काँग्रेसने माफी मागावी! सुनेत्रा पवार यांच्याबाबतच्या पोस्टवरुन एकनाथ शिंदे यांची मागणी
पनीर ॲनालॉग हे दिसायला पनीरसारखे असल्याने सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असते. हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स, क्लाऊड किचन आणि इतर खाद्यसेवा आस्थापनांना अशा प्रकारचे पनीर कोणत्याही खाद्यपदार्थात वापरण्यास, साठवण्यास किंवा ग्राहकांना देण्यास मनाई करण्यात आली आहे. ग्राहकांची दिशाभूल करणारी कोणतीही कृती अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन मानली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ‘ऑल फूड ॲण्ड लायसन्स होल्डर्स फाउंडेशन’चे अध्यक्ष ॲड. अभय पांडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
‘पनीर ॲनालॉग’मुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा असोसिएशनने उपस्थित केला होता. त्याची दखल घेत एफडीएने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Mumbai Police Salary Scam: मुंबई पोलिस वेतन घोटाळ्याची व्याप्ती वाढणार; आरोपींच्या कामाचे ऑडिट सुरु, 2 अधिकारी निलंबित
‘अॅनालॉग’ म्हणजे काय ?
-दुधाऐवजी वनस्पती तेल, वनस्पती चरबी किंवा इतर दुग्धेतर घटक वापरून निर्मिती.
-राज्यात अनेक ठिकाणी पनीरऐवजी ‘पनीर ॲनालॉग’चा वापर.
-आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत.
