ठाणे आरटीओ कार्यालयात सुरु असलेले मराठी वर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावले. अमराठी चालकांना रिक्षा आणि टॅक्सीचे परमिट देण्याआधी मराठी तरुणांना प्राधान्य द्या, अशी मागणी यावेळी मनसेच्या आंदोलकांनी केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी येणे सक्तीचं करण्यात आलं आहे. ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणार नाही त्यांच्यावर परिवहन विभागाकडून आगामी काळात कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी प्रशिक्षण वर्गदेखील सुरु केले आहेत. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कमीतकमी जुजबी मराठी बोलता यावी, असा त्यामागचा उद्देश आहे. तसेच परिवहन विभागाकडून परमिट देण्याआधी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे शिक्षण दिलं जात आहे. पण ठाण्यात मराठीचं शिक्षण सुरु असलेला एक वर्ग मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. रिक्षा आणि टॅक्सीचे परमिट मराठी उमेदवारांना प्राधान्याने द्यावे, अशी मागणी आंदोलक मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली.
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात अमराठी रिक्षा – टॅक्सी चालकांना परमिट देण्याआधी सुरु असलेले मराठीचे वर्ग बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावले. यावेळी मराठी उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी मनसैनिकांनी केली. तसेच अमराठी उमेदवारांना या वर्गातून हुसकावून लावले.
मराठी लिहिता वाचता येत नसेल त्या रिक्षा – टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याबाबत परिवहन विभागाने हालचाली सुरु केल्या होत्या. आधी गेल्या १ मे म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’च्या मुहूर्तावर ही कारवाई केली जाणार होती. त्यानंतर या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निर्णय घेतला होता. तसेच १५ ऑगस्टनंतर अशा पद्धतीने कारवाई केली जाईल, असे परिवहन विभागाने सूचित केले होते.
या पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात अमराठी रिक्षा – टॅक्सी चालकांसाठी मराठीचे वर्ग सुरु होते. या ठिकाणी मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसैनिकांनी या अमराठी उमेदवारांना हुसकावून लावले. या परप्रांतीय उमेदवारांना काय शिकविता, पहिले प्राधान्य आपल्या मराठी मुलांना द्या, अशी मागणी या ठिकाणी मोरे यांनी केली. या प्रसंगी मनसे उपशहराध्यक्ष पुष्करराज विचारे, संदीप साळुंखे, प्रशांत पालांडे उपस्थित होते.
वाढत्या गुन्हेगारीला बळ, मनसेचा आरोप
महाराष्ट्रात परप्रांतीय रिक्षा – टॅक्सी चालकांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे राज्यात गुन्हे वाढत आहेत. शहरात बेशिस्तपणे पार्किंग करून हे चालक भाडं नाकारतात. ठाण्यात ज्युपिटर रुग्णालयासमोर रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी जाब विचारल्याने ७६ वर्षीय सरोश दस्तूर यांना अमानुष अँप आधारित टॅक्सी चालक निशांत धर शुक्ला (४०) या परप्रांतीय चालकानेच मारहाण केली होती. त्यामुळे या उमेदवारांना प्रोत्साहन न देता आपल्या मराठी मुलांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेचे रवींद्र मोरे यांनी केली. दरम्यान, याबाबत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा