Baramati Accident: एका अपघाताने बोडरे कुटुंबाचे आयुष्यच बदलून गेले आहे. दोन बहिणींनंतर आता १० वर्षीय पवनचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एका अपघातात तिन्ही भावंडांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती: बारामती तालुकातल्यानिरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या १० वर्षीय पवन ज्ञानेश्वर बोडरे याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बोडरे कुटुंबातील तिन्ही भावंडांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे मुरूम (ता. फलटण) गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघाताने हिरावली तीन लेकरे
शनिवारी (दि. ६) सेजल ज्ञानेश्वर बोडरे (१७), अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (१५) आणि त्यांचा भाऊ पवन (१०) हे मामाच्या गावी जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटीवरून निघाले होते. चौधरवाडी फाट्याजवळ स्कुटी आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन सेजल व अक्षरा यांचा जागीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला होता.
पवनची मृत्यूशी झुंज अपयशी
पवनवर प्रथम बारामती येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी (दि. ९) मध्यरात्री सुमारे १.३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
Rupali Chakankar: ‘अशोक खरात प्रकरणात माझ्यावरचे आरोप वेदनादायक’; बदनामी करणाऱ्यांना रुपाली चाकणकरांच्या धडाधड नोटीसा, थेट दिल्ली कोर्टापर्यंत खेचलं
गावात शोककळा, हळहळ व्यक्त
यापूर्वी रविवारी सेजल आणि अक्षरा यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पवनच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला. एका अपघातात तिन्ही लेकरांचा मृत्यू झाल्याने बोडरे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बोडरे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. अवघ्या काही क्षणांच्या अपघाताने एका कुटुंबातील तीन निष्पाप जीव हिरावले गेल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. मुरूम गावातील अनेकांनी या घटनेला अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगितले. गावातील वातावरण शोकमय झाले असून नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून निष्काळजीपणाची मोठी किंमत कुटुंबाला मोजावी लागल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तिन्ही भावंडांच्या आठवणींनी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा