Ahilyanagar Elder Woman Dies hit by Iron Sheet : राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगरमध्ये काल झालेल्या वादळी पावसामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
अहिल्यानगर आडगाव महिलेचा पत्रा लागून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील कडगाव, मिरी, शंकरवाडी आणि शिराळ परिसराला काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जबरदस्त तडाखा दिला. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे अनेक ठिकाणी घरांचं, शेतीचं आणि वीज यंत्रणेचं मोठं नुकसान झालं असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
घरावर कोसळली भिंत आणि महिलेचा मृत्यू
कडगाव येथील शेतकरी विलास किसन शिरसाट यांच्या घरावर रात्री साडेनऊच्या सुमारास वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला. त्यावेळी कुटुंबातील सदस्य पडवीत झोपले होते. अचानक घरावरील पत्रे उडून गेली आणि त्यावरील भिंत थेट पडवीवर कोसळली. या दुर्घटनेत समाबाई विलास शिरसाट (वय 75) यांच्या डोक्यावर पत्र्याचा जबर मार लागल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत विलास शिरसाट, सागर शिरसाट, विराज शिरसाट, अलका शिरसाट यांच्यासह अन्य काही कुटुंबीय जखमी झाले आहेत. अचानक घर कोसळल्यानं काहीकाळ एकच गोंधळ उडाला होता. जखमींवर उपचार सुरू असून कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. Pune Crime : पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, दिवेघाटात पोलिसांचा थरारक पाठलाग, सिनेमासारख्या घडामोडी
वीजपुरवठा खंडित जनजीवन विस्कळीत
वादळी वाऱ्यामुळे मिरी आणि शंकरवाडी परिसरातील अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि तारा तुटून पडल्या. परिणामी अनेक गावांचा वीजपुरवठा रात्रभर खंडित झाला होता. नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. शिराळ परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेतातील सोलर पॅनलच्या प्लेटा उडून गेल्या असून सौर कृषी पंपांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी अक्षय निवृत्ती झाडे यांच्या गट क्रमांक 459 मधील ओसवाल कंपनीच्या सौर कृषी पंपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. Rain Update : उषःकाल होता होता… पावसाचा लपंडाव, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, मुख्यमंत्री कार्यालयाकडून मोलाची माहिती
मदत व पंचनाम्याची मागणी
अचानक आलेल्या या वादळामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकसानग्रस्त भागांचं तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा