Marathi Live News: ‘केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सात दिवसांत राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन करू’, असा इशारा कॉक्रोच जनता पक्षाने (सीजेपी) शनिवारी दिला. ‘सीजेपी’ने शनिवारी जंतर-मंतर येथे केलेल्या आंदोलनाला देशभरातून आलेल्या हजारो विद्यार्थी आणि समर्थकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यात ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यत्वे प्रधान यांना लक्ष्य केले.गेल्या अनेक दिवसांपासून ज्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे; तो मोसमी पाऊस अखेरीस राज्यात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडवासीयांनी शनिवारी मान्सूनच्या पहिल्या सुखसरींचा अनुभव घेतला. येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून राज्यात पुढे सरकण्याची शक्यता आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या पाहा एकाच क्लिकवर
