Monsoon Update: बहुप्रतिक्षित मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात हळूहळू पुढे सरकणार आहे. रविवारी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, चिपळूण: गेल्या अनेक दिवसांपासून ज्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे; तो मोसमी पाऊस अखेरीस राज्यात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडवासीयांनी शनिवारी मान्सूनच्या पहिल्या सुखसरींचा अनुभव घेतला. येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून राज्यात पुढे सरकण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरी
कर्नाटक, संपूर्ण गोवा अशी मार्गक्रमणा करून दक्षिण कोकणात शनिवारी मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा मान्सूनच्या आगमनाचे प्रवेशद्वार समजला जातो. जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, वैभववाडी तालुक्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शेतीकामांना आता सुरुवात होणार असून, वातावरणातील उष्माही कमी झाला आहे.
Maharashtra Monsoon: आला रेss आला! महाराष्ट्रात मान्सून धडकला, शेतकरी राजा सुखावला, लवकरच राजधानी मुंबईसह राज्यात बरसणार
पुढील दोन-तीन दिवसांत कोकणासह दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सालाबादप्रमाणे यंदाही मच्छिमार बांधवांनी एक जूनपासून बोटी, होड्या किनाऱ्यावर नांगरल्या आहेत. दुसरीकडे भातशेतीच्या कामांना आता वेग येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातही राजापूर आणि रत्नागिरी शहराच्या परिसरात हलक्या सरी कोसळल्या.
रविवारी महाराष्ट्राला अलर्ट
महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नाशिक जिल्ह्यात रविवारसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. 7 जूनपासून उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये मेघगर्जना व वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण व गोव्यामध्ये 7 ते 12 जूनदरम्यान हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. 10 जूनपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
El Nino: प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय झाल्याची चिन्हे, आंतरराष्ट्रीय हवामान संस्थेकडून जगाला इशारा; भारतावर मोठा परिणाम
10 जूनपर्यंत गोवा आणि कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह ताशी 60 किमा वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि साताऱ्यातील काही भागांमध्ये रविवारी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावासासठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा