• Sun. Jun 7th, 2026

    Rohit Pawar: सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवाराचं अन्नत्याग; 12 जूनपासून पंढरपुरात आंदोलन, सोशल मीडियावर दिली माहिती

    Rohit Pawar: सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवाराचं अन्नत्याग; 12 जूनपासून पंढरपुरात आंदोलन, सोशल मीडियावर दिली माहिती

    Rohit Pawar: ​​रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी १२ जूनपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    रोहित पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शपचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

    रोहित पवार यांनी या कर्जमाफीच्या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी १२ जूनपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. पंढरपूर येथे हे आंदोलन करण्यात येणार असून कर्जमाफी, पीकविमा आणि शेतकरी खात्यांमध्ये थेट आर्थिक मदत यांसह विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या आहे.

    Maharashtra TimesMaratha Reservation : अखेर लढ्याला यश आलं! मनोज जरांगे इम्पॅक्ट, मराठा समाजासाठी मोठे निर्णय; वाचा संपूर्ण शासन निर्णय
    आमदार रोहित पवार यांनी एक्सवर या आंदोलनाची घोषणा केली. ‘२०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेतील अटी शिथिल कराव्यात, तसेच दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा द्यावा’, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय २०१७च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सुमारे ६.५६ लाख शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा, पीकविमा योजनेतील कथित जाचक अटी रद्द करून एक रुपयातील पीकविमा योजना पुन्हा लागू करावी आणि पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

    उद्धव ठाकरे यांची फसवणूक, शिवसेना संपवण्याचा डाव? बाळ माने-विनायक राऊतांचं एकमेकांकडे बोट

    ‘काॅक्रोच’चे म्हणणे ऐकावेच लागेल
    ‘दिल्लीच्या जंतरमंतरवर ‘कॉक्रोच’चे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते आणि भवितव्य म्हणतो ते हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवणे योग्य नाही. हे सर्व विद्यार्थी ‘कॉक्रोच’ बनून आपला आक्रोश व्यक्त करीत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल,’ अशी भूमिका शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केली. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा